Ajit Pawar News 
पुणे

Ajit Pawar : एक फोन अन् अजित पवार मदतीला धावले! रुग्णाचे साडेसहा लाखांचे बिल आले ५० हजारावर

Ajit Pawar News : नेता जागरुक असला की लोकांना तत्परतेने मदत होते, प्रसंगी लोकांच्या मदतीसाठी नेते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंतही दाद मागतात याचा प्रत्यय बारामतीतील एका कुटुंबास आला.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : नेता जागरुक असला की लोकांना तत्परतेने मदत होते, प्रसंगी लोकांच्या मदतीसाठी नेते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंतही दाद मागतात याचा प्रत्यय बारामतीतील एका कुटुंबास आला. तालुक्यातील एका महिलेस साप चावल्याने तिची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. सुरवातीला बारामती व नंतर पुण्याला तिला रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र दाखल करताना व उपचारासाठी संबंधित महिलेच्या पतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली.

यानंतर अजित पवार यांनी त्यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना संबंधितांना सर्वतोपरी मदतीच्या सूचना केल्या. इतके करुन पवार थांबले नाहीत तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी स्वतः संबंधित कुटुंबियांना फोन करुन प्रस्ताव मागून घेतला. इतकेच नाही तर या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या मदतीची गरज असल्याने एका बैठकीदरम्यान अजित पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कुटुंबाला विशेष बाब म्हणून मदत करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्वरित हा प्रस्ताव मंजूर केला.

एकीकडे ही प्रक्रीया वेगाने सुरु असतानाच संबंधित महिलेची जीवन-मरणाची लढाई संपुष्टात आली. त्या नंतर त्या कुटुंबाला पुण्यातील एका रुग्णालयाने तब्बल साडेसहा लाखांचे बिल दिले. पुन्हा अजित पवार मदतीला धावून आले आणि त्यांनी सुनीलकुमार मुसळे यांच्या मार्फत अवघ्या पन्नास हजार रुपयांपर्यंत हे बिल खाली आणले. उपचार सुरु असताना व पत्नीच्या मृत्यूनंतरही मोठ्या भावाप्रमाणे अजित पवार व सुनीलकुमार मुसळे मदतीला धावून आल्याने संबंधित कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT