Ajit Pawar in Namo Rojgar Melava  Esakal
पुणे

Ajit Pawar in Namo Rojgar Melava : पोलिसांच्या ताफ्यात नवीन 39 गाड्या दाखल! त्याच्यात १४ महिला ड्रायव्हर, अजित पवार म्हणाले, 'महिलांनाही संधी देण्याचं..'

Ajit Pawar in Namo Rojgar Melava : महिलांनाही संधी देण्याचं काम महायुती सरकार करत आहे असंही अजित पवार यावेळी म्हणालेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बारामती येथे विद्या प्रतिष्ठाणच्या संस्थेत नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, निलम गोऱ्हे इत्यादी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज्यातील अनेकांना रोजगार मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर महिलांनाही संधी देण्याचं काम महायुती सरकार करत आहे असंही अजित पवार यावेळी म्हणालेत.

अजित पवारांनी यावेळी सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उशिर होणार होता. पोलिसांच्या ताफ्यात नवीन 39 गाड्या दाखल झाल्या आहेत. याचा शुभारंभ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून मी केला. तिथे ३९ वाहनांमध्ये जे ड्रायव्हर होते, त्याच्यात १४ महिला होत्या. सर्वांत चांगलं काम त्यांचं सुरू होतं. महिलांना संधी देण्याचं काम महायुती सरकार करत आहे असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

आज करोडो कामे बारामतीकरांसाठी करण्यात येत आहेत. अशा प्रकारे टप्याटप्याने पुढे जात राहु. एक दिवस विकासाच्या बाबतीत राज्यात बारामती तालुका एक नंबर असेल असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

देशात विदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत. त्या संधीचं सोनं करायचं आहे. आधीच्या बारामतीत आणि आताच्या बारामतीत मोठा फरक झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना अजित पवारांनी बारामतीत झालेल्या बदलांची यादी वाचून दाखवली. आता राज्यातील सर्वांत मोठं बस स्थानक बारामतीत उभारलं आहे. आज करोडो रूपयांची कामे पुर्णत्वाला जात आहेत. बारामतीचा कायापालट झाला आहे, असंही ते म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपुरात १०० एकरवर ‘पल्स प्रोटिन पार्क’; ५०० कोटींच्या गुंतवणुकीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Successful Kidney Transplant: पतीच्या नवजीवनासाठी पत्नीचा त्याग! हसीना शेख यांनी किडनी दान करून अस्लम यांना दिले जीवनदान, त्यागाची भावस्पर्शी कहाणी..

Latest Marathi News Live Update : दक्षिण चेन्नईतील अनेक निवासी भागांत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले

Majalgaon Telgaon Road Accident : माजलगावजवळ एसटी बस आणि कारची भीषण धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू, तुळजापूरला देवीच्या दर्शनला निघाले पण...

Kolhapur Mangav Murder Case : मंदिरातून परतताना अल्पवयीन मुलगीचा धारदार शस्त्राने खून, कोल्हापुरातील माणगाव धक्कादायक घटना; आरोपीचा अद्यापही शोध नाही

SCROLL FOR NEXT