पुणे

मुलाने फोन न उचल्याने आईला केली मारहाण; अजनाळे येथील घटना

CD

मुलाने फोन न उचलल्याने
आईला मारहाण; अजनाळेतील घटना
सांगोला, ता. २० : मुलाने फोन न उचलल्याच्या कारणावरून घराचा दरवाजा वाजवून आत शिरण्याचा प्रयत्न करत महिलेला शिवीगाळ व ढकलाढकली केल्याची घटना अजनाळे येथे गुरुवारी (ता. २०) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी घरासमोरील कारच्या काचा लाकडी काठीने फोडून नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मंगल पांडुरंग कोळवले (वय ५८, रा. अजनाळे) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, मंगल कोळवले व त्यांचे कुटुंबीय रात्री जेवण करून घरात झोपले होते. दरवाजा वाजल्याने त्यांचा मुलगा वैभव याने तो उघडला. त्यावेळी प्रविण दत्तात्रय येलपले हा दारात उभा होता. त्याने वैभवला ‘फोन का उचलत नाहीस, तुझ्या मागे कोण आहे, त्याला बोलावून घे,’ असे म्हणत शिवीगाळ केली. मंगल यांनी जाब विचारल्यावर प्रवीण येलपले याने त्यांना ढकलून शिवीगाळ केली. त्यानंतर अश्लील धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशाल गोरख येलपले व महादेव पवार यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. मात्र, त्यानंतर प्रवीण येलपले याने लाकडी काठीने कारच्या काचा फोडल्या. मंगल यांचे पती पांडुरंग यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

हसत-गात पारंपारिक गाण्यावर केलेलं नृत्य, निधनाच्या काही तासांपूर्वी गोव्यातील कार्यक्रमात नाना पाटेकरांनी धरला होता ठेका, Video

SCROLL FOR NEXT