पुणे

अक्कलकोट तालुक्यात 93 हजार हेक्टर खरीप पेरणी होण्याचा अंदाज ; कृषी विभाग खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मदतीला सज्ज

CD

PNE26W19831
‘एआय’ छायाचित्र.
---
अक्कलकोट तालुका खरीप हंगामासाठी सज्ज
९३ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन; सोयाबीन-तूरकडे शेतकऱ्यांचा कल
राजशेखर चौधरी : सकाळ वृत्तसेवा
जेऊर, ता. १७ : अक्कलकोट तालुका येत्या खरीप २०२६ हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. यंदा तालुक्यात एकूण ९२ हजार ९६६ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रावर खरिपाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ही माहिती तालुका कृषी विकास अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांनी दिली.
गेल्या पन्नास वर्षांतील अक्कलकोट तालुक्याची खरीप पेरणीची सरासरी ९१ हजार ११० हेक्टर एवढी असून, यंदाही त्या आसपासच पेरणी अपेक्षित आहे. तूर पिकाची पेरणी सर्वाधिक होणार असून, त्याखालोखाल उडीद आणि सोयाबीनचा समान वाटा राहणार आहे. बाजारपेठेतील बदलांमुळे शेतकरी आता सोयाबीन, टोमॅटो, कांदा तसेच पालेभाज्या, फळभाज्या आणि फळबागांसारख्या नगदी पिकांकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचे चित्र दिसत आहे.
---
खतांचे नियोजन पूर्ण; बफर साठा राखीव
तालुक्यातील ९२ हजार ९६६ हेक्टर पेरणी क्षेत्रासाठी कृषी विभागाने खतांचे व्यापक नियोजन केले आहे. युरिया : ८२३० मे. टन, डीएपी : २२१९ मे. टन, एमओपी : १००२ मे. टन, एसएसपी : २३६८ मे. टन, कॉम्प्लेक्स : ७०२८ मे. टन असा एकूण मंजूर खतसाठा २०,८५७ मेट्रिक टन आहे. याशिवाय एमआयडीसी आणि फेडरेशनकडे युरिया १५७० मे. टन व डीएपी १५० मे. टन असा बफर साठा राखीव ठेवण्यात आला आहे.
---
बियाणे उपलब्धता अन्‌ मागणी
तालुक्यात खरीप हंगामासाठी एकूण १९,५८० क्विंटल बियाण्यांची गरज असून, सध्या १,६९८ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत. उर्वरित बियाण्यांचा पुरवठा वेळेत करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
---
‘जलतारा’ अन्‌ शोषखड्डा संकल्पना राबविणार
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय कृषी मोहिमा सुरू असून बीज प्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी आणि मृद्‌ परीक्षणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. अल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून प्रत्येक शेतकऱ्याला ‘प्रति एकरी एक जलतारा’ अंतर्गत शोषखड्डा तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी मनरेगा, लोकसहभाग आणि सीएसआर निधीचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक खड्ड्यास ४,६०० रुपये अनुदान देय असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
---
विविध योजनांवर भर
- मनरेगा फळबाग लागवड अर्ज प्रक्रिया सुरू
- सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत ३५ टक्के अनुदान
- बेदाणा, मिरची कांडप मशिन, पापड उद्योग आदींना प्रोत्साहन
- खत व बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवण्याचे नियोजन
---
कोट
हवामानाचा अचूक अंदाज घेऊन आणि पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे. बाजारपेठेत खत आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने कोणत्याही प्रकारच्या टंचाईबाबत चिंता करण्याचे कारण नाही. बियाणे व खते खरेदी करताना योग्य त्या पावत्या घेणे आणि त्याचे टॅग सांभाळून ठेवणे आवश्यक आहे.
- चंद्रकांत मंगरुळे, तालुका कृषी अधिकारी, अक्कलकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT