पुणे

अकोल्यात सोमवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी उद्योगवाढीचे व्यासपीठ

CD

अकोल्यात जिल्हास्तरीय
गुंतवणूक परिषद सोमवारी

उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी उद्योगवाढीचे व्यासपीठ

अकोला : जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासह नव-उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. ३१) जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता ही परिषद होणार आहे.
या परिषदेत जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील संभाव्य गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग, व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. परिषदेत जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या संधी, औद्योगिक सुविधा आणि व्यवसायवाढीसाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. उद्योगांसाठी आवश्यक परवाने व विविध शासकीय मंजुरी वेळेत मिळण्यासाठी ‘मैत्री’ कायदा आणि सुविधा कक्षाची माहितीही देण्यात येणार आहे.
विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ परिषदेत सहभागी होऊन औद्योगिक सुविधा, व्यापारवाढ आणि गुंतवणुकीच्या संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यात नवीन व्यवसाय आकर्षित करण्यासाठी तसेच विद्यमान उद्योगांच्या विस्ताराला चालना देण्यासाठीही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्ह्यातील नवउद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना शासकीय यंत्रणेशी थेट संवाद साधण्याची संधी या परिषदेत उपलब्ध होणार आहे. गुंतवणुकीसाठी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त संतोष बनसोड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Intercity: पुणे-मुंबई इंटरसिटीच्या डबे वाढवण्याला ‘ब्रेक’; फलाट आणि पिट लाइन अपुरी, प्रवाशांना नाहक फटका

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांच्या शेतात याल, तर दरोडेखोरांप्रमाणेच वागणूक देऊन चोप देऊ; राजू शेट्टींचा थेट इशारा

AI Healthcare Breakthrough: जगात पहिल्यांदाच AIच्या मदतीने मेंदूची शस्त्रक्रिया; रुग्णाची दृष्टी वाचवण्यात यश

Marathi News Live Updates : पंकजा मुंडे, आदिती तटकरे यांनी बांधली धनंजय मुंडेंना राखी; भावाने दिला आशीर्वाद

BJP woman leader daughter in law : भाजप महिला नेत्याच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल; अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी, विवाहबाह्य संबंधांचा आरोप

SCROLL FOR NEXT