पुणे

रोहित्र चोरी करणाऱ्या परप्रांतीयांना बेड्या

CD

आळंदी, ता. १५ : आळंदी पोलिस ठाण्यातील ८ गुन्ह्यांत हवा असलेल्या आरोपीसह उत्तर प्रदेशातील तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ ने अटक केली असून एक जण फरार आहे. या कारवाईत विद्युत रोहित्र (डीपी) चोरीचे ६ गुन्हे उघडकीस आले असून, ५ लाख ९१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सभाजित मुरलीधर गौतम जैस्वार (वय ४५, रा. भदखिन, ता. माडियाहू, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश), विनोद हरिराम जैस्वार (वय ४०, रा. जेगापूर, ता. माडियाहू, जि. जौनपूर) आणि मनीष महेंद्र प्रसाद (वय ३८, रा. भदखिन) या तिघांना अटक करण्यात आली आहे. जुल्फिकार खान (रा. मंतरवाडी, उंड्री, पुणे) याचा पोलिस शोध घेत आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १३) पहाटे पोलिस कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर यांना मिळालेल्या माहितीवरून मरकळ-पिंपळगाव (ता. खेड) येथील भीमा पार्क परिसरात सापळा लावण्यात आला. तेथे संशयास्पदरीत्या थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतले असता, सभाजित जैस्वार हा ८ गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींनी आळंदी परिसरात डीपी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीसाठी लागणारे साहित्य, ५० हजार रुपयांची मोटारसायकल आणि ५ लाख ४० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचे गट्टू असा एकूण ५ लाख ९१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपींना आळंदी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

Rahul Gandhi: अंकिता भंडारी प्रकरणात राहुल गांधींचं राष्ट्रपतींना पत्र, ''दुष्यंत गौतम राज्यपाल नको..''

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

SCROLL FOR NEXT