Pune University 
पुणे

'वर्क फ्राॅम होम'ची परवानगी द्या; शिक्षक संघटनेची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : लाॅकडाऊनचा कालावधी वाढलेला असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयात प्राध्यापकांना हजेरी अनिवार्य आहे. यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत असून, यातून सुट देऊन, प्राध्यापकांना घरातून काम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षक हितकारिणी संघटनेने कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात 'कोरोना'चा संसर्ग वाढत आहे. राज्य सरकारने जुलै महिन्यात ही लाॅकडाऊन कायम असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धोका टळला नसतानाही महाविद्यालयात प्राध्यापकांनी येऊन काम करावे लागत आहे. त्यामुळे प्राध्यापकांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील पुणे शहर-जिल्हा, नाशिक शहर येथे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असताना संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांना महाविद्यालयात येता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ३१ जुलैपर्यंत प्राध्यापकांना न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही ३१ जुलैपर्यंत घरातून काम करण्याचे निर्देश द्यावेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी नसल्याने अध्यापनही होत नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांनी महाविद्यालयात येणे आवश्यक नाही. याचा विचार करून प्राध्यापकांना घरातून काम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी शिक्षक हितकारिणी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

Karnataka CM Rotation Issue : कर्नाटकच्या राजकारणात होणार मोठा गेम? '...तर वेगळा निर्णय घेऊ!' डी. के. शिवकुमार यांचा हायकमांडला थेट इशारा; सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात?

Ajit Pawar Plane Crash Investigation : अजितदादांच्या अपघाताला जबाबदार VSR विमान कंपनीची सखोल चौकशी होणार, मालक व्ही. के. सिंग CID कार्यालयात हजर

T20 World Cup, IND vs ENG: वानखेडेची खेळपट्टी कोणाला करणार मदत? काय आहे आत्तापर्यंतचा इतिहास, जाणून घ्या

Kagal MIDC Crime News : होळीच्या जल्लोषातून दारू पिऊन तरुणाचा लोखंडी पाइपने केला खून; कागल पंचतारांकित एमआयडीसीतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT