पुणे

देशभरात २५०आश्रय केंद्रे उभारण्याची योजना ॲमेझॉन इंडियाची वाहनचालकांसाठी विशेष सुविधा

CD

देशभरात २५०आश्रय केंद्रे उभारण्याची योजना
ॲमेझॉन इंडियाची वाहनचालकांसाठी विशेष सुविधा
मुंबई,ता. ११ ः ॲमेझॉनसाठी काम करणाऱ्या वाहनचालकांच्या विश्रांतीसाठी उभारण्यात आलेल्या आश्रय केंद्रांचे जाळे आणखी विस्तारण्याचा निर्णय ॲमेझॉन इंडियाने घेतला असून, या वर्षाखेर २५० नवी आश्रय केंद्रे सुरू करण्याची घोषणा केली आहे. सध्या दिल्ली एनसीआर, मुंबई, बंगळूरू, चेन्नई आदी १६ शहरांमध्ये १०० आश्रय केंद्रे सुरू असून, या विस्ताराचा भाग म्हणून, मे अखेरपर्यंत ५० नवी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम, उद्यासा फाउंडेशन आणि ग्रामीण शिक्षण व विकास इंडिया यांसारख्या संस्थांसोबत काम करत आहे,
आश्रय केंद्राचा लाभ तर इतर कंपन्यांचे चालकही घेऊ शकतात. या केंद्रांमध्ये वातानूकूलन यंत्रणा, पिण्याचे स्वच्छ पाणी, इलेक्ट्रोलाइट्स, मोबाईल चार्जिंग पॉइंट, स्वच्छ शौचालये, प्रथमोपचार सुविधा आणि आरामदायी जागा उपलब्ध आहेत. कंपनीने या एसी व्हॅन्सच्या माध्यमातून जास्त वाहतूक असलेल्या मार्गांवर मोबाइल ‘आश्रय’ केंद्रेदेखील सुरू केली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना स्थिर केंद्रावर जाण्याची गरज न पडता येथे विश्रांती घेता येते. ‘‘आमच्या सहकाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे. आमच्या २८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून यासाठी खर्च केला जात आहे.’’ असे ‘ॲमेझॉन इंडिया’चे डायरेक्टर ऑपरेशन्स, सलीम मेमन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT