पुणे

रस्ता अडवल्याने ३०० कुटुंबांचे दळणवळण ठप्प

CD

मंचर, ता. १८ : तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथील चिमणवाडीकडे जाणारा रस्ता दगड आणि काटेरी फांद्या टाकून अडविल्याने ३०० कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. गेल्या २६ तासांपासून दळणवळण बंद असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने हा मार्ग तातडीने खुला करावा, अशी मागणी सरपंच प्राजक्ता तांबडे व ग्रामस्थांनी केली आहे.
पुणे- नाशिक महामार्गाच्या पश्चिमेला असलेल्या या रस्त्यावर माजी उपसरपंच मयूर भोर यांनी अडथळे निर्माण केल्याचा आरोप ग्रामपंचायतीने तहसीलदार आणि मंचर पोलिसांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या रस्त्यासाठी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, जिल्हा परिषदेमार्फत खडीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, रस्ता बंद केल्यामुळे प्रस्तावित डांबरीकरणाचे कामही रखडण्याची भीती व्यक्त होत आहे.

रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार
सरपंच प्राजक्ता तांबडे म्हणाल्या, ‘‘चिमणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली असून त्यामध्ये मयूर भोर यांचाही समावेश आहे. मात्र चिमणघाट रस्त्याच्या वादातून दुसरा रस्ता बंद करणे योग्य नाही. चिमणघाट येथील शेतकरी भिवसेन तांबडे यांच्या शेतजमिनीतून सुमारे २६७ मीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित असून, त्यासाठी जवळपास चार गुंठे जमीन जाणार आहे. संबंधित शेतकऱ्याने इतरांनी सहकार्य केल्यास आपणही सहमती देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे चिमणघाट रस्त्याचाही प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहोत.’’

चिमणघाट रस्त्यासाठी १५ लाख रुपये निधी आलेला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यानंतर अडवलेला रस्ता खुला करण्यास मी तयार आहे.
- मयूर भोर, माजी उपसरपंच

तांबडेमळ्याचे कामगार तलाठी प्रकाश राठोड यांना घटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधितांना नोटीस दिल्या जातील. गुरुवारी (ता. २१) मी घटनास्थळी भेट देणार आहे. त्यानंतर कार्यवाही केली जाईल.
- आरती खरे, मंडल अधिकारी, मंचर

15811

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Ticket Price : एसटी प्रवास महागणार? मे महिन्यानंतर खिशाला कात्री बसण्याची शक्यता; काय आहे कारण?

MS Dhoni आज 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून खेळणार होता, परंतु असं काहीतरी घडलं की...! त्यात, R Ashwin च्या ट्विटने खळबळ

' तो मला किस करतच राहिला आणि ...' प्रिया बापटने सांगितला सेटवरचा अनुभव, म्हणाली...'त्याने मला चुकीच्या ...'

आता मनमानी पद्धतीने शाळांचे स्थलांतर होणार नाही! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवे नियम लागू

Latest Marathi News Live Update : पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT