पुणे

कोथाळे चे अंबीका महादेव मंदीर,सातशे वर्षापुर्वीचा ऐतीहासीक ठेवा

CD

MOH26B03617, MOH26B03618
मोहोळ ः मंदिरातील महादेवाची पिंड, दुरवस्था झालेले मंदिर व तोडफोड झालेला नंदी असे तीन फोटो पाठवले आहेत.

द्वापार युगाच्या आठवणी जपणारे
कोथाळ्याचे अंबिका महादेव

मोहोळ, ता. २० ः कोथाळे (ता. मोहोल) येथील अंबिका महादेव मंदिर इतिहास अन् आख्यायिकेचा वारसा सांगणारे आहे. ७०० वर्षांपूर्वीचे यादवकालीन मंदिर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. द्वापार युगाशी संबंधित असलेल्या या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यानिमित्त ग्रामस्थांनी मंदिर अन् परिसराची स्वच्छता करून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे.

मंदिराचे वैशिष्ट्य ः मंदिरात महादेवाच्या तीन पिंडी आहेत. मंदिरासमोर असलेला नंदी अत्यंत देखणा असून, जिल्ह्यात अशा प्रकारचा नंदी अन्यत्र आढळत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. मंदिर त्याकाळच्या दंडकारण्य परिसरात असल्याची पुराणात नोंद असल्याचेही सांगितले जाते. औरंगजेबाचे काही काळ बेगमपूर येथे वास्तव्य असताना मंदिरातील पिंडी अन् नंदीच्या मुखाची तोडफोड करण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात.

अंबिकेमुळे पडले नाव ः मंदिराच्या नावामागे महाभारतकालीन आख्यायिका आहे. काशीच्या राजाला आंबा, अंबिका अन् अंबालिका अशा तीन मुली होत्या. त्यांच्या स्वयंवराचे आयोजन करण्यात आले होते. भीष्माचार्यांना स्वयंवराचे आमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यांना स्वयंवराची माहिती मिळाल्यानंतर ते तेथे गेले. उपस्थित राजांना पराभूत करून त्यांनी तिन्ही राजकन्यांना सोबत आणले, अशी आख्यायिका आहे. त्यापैकी अंबिका कोथाळे येथे आली. त्यामुळे येथील महादेवाला ‘अंबिका महादेव’ असे संबोधले जाते, असे ग्रामस्थ सांगतात.

ग्रामस्थांची मागणी ः कौरव-पांडवांच्या आधी अन् द्वापार युगातील हा ऐतिहासिक ठेवा आहे. ७०० वर्षांपूर्वीची कागदपत्रे कुठून उपलब्ध करायची, हा प्रश्न आहे. प्रशासनाने अन् पुरातत्त्व विभागाने यातून मार्ग काढून मंदिराचा उद्धार करावा, अशी मागणी माजी सरपंच पांडुरंग माने यांनी केली.

कसे जाल
कोथाळे गाव सोलापूर-कोल्हापूर महामार्गावरील इंचगावपासून सुमारे तीन किलोमीटर पश्चिमेला आहे. तसेच मोहोळ-मंद्रूप महामार्गावरील नजीक पिंपरी येथूनही अंबिका महादेव मंदिराकडे जाता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT