amitabh bachchan collage painting sakal
पुणे

Saswad News : अमिताभ बच्चन यांची 75×50 फुट आकाराची भव्य कोलाज चित्रकृती साकारली

अमिताभच्या वाढदिवसानिमित्त रंगोलीकार सोमनाथ भोंगळे यांची अनोखी भेट.

श्रीकृष्ण नेवसे

सासवड - येथील प्रसिद्ध रंगोलीकार सोमनाथ भोंगळे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सासवडमध्ये कॉलेजचे प्राचार्य इस्माईल सय्यद यांच्या सहकार्याने 5,000 शालेय पुस्तके व 500 दप्तरे, सॅग या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून 75×50 फुट आकाराचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे भव्य कोलाज चित्रकृती त्यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त साकारले व अमिताभ यांना भेट म्हणून सादर केले.

पुरंदर शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर साकार केली. रंगोलीकार सोमनाथ भोंगळे हे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षापासून दरवर्षी विविध चित्रपटातील दृश्य रांगोळीच्या.. त्यातही विशेषतः थ्री.डी. रांगोळ्यांच्या माध्यमातून साकारत असतात. या लक्षवेधी थ्री.डी. रांगोळ्यांचे चित्ररूपामध्ये प्रदर्शन भरवत असतात.

या वर्षी मात्र आगळावेगळा असा उपक्रम करण्याचे त्यांनी ठरवले व शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून ही चित्रकृती तब्बल सात तास सहकलाकार मयुर दुधाळ, सुप्रिया दुधाळ, अभिषेक शिंदे, अविष्कार भोंगळे, रिया भोंगळ यांच्यासह सोमनाथ भोंगळे यांनी ही कोलाज चित्रकृती साकारली. याकामी पुरंदर सैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य देत याकामी मदत केली.

साकारलेले चित्र काल (ता. 13) पाहण्यासाठी पुरंदर हायस्कूल, बालविकास मंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या अडीच हजार विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी गर्दी केली होती. यावेळी या कलेचे कौतुक उपस्थित प्रा. केशव काकडे, संदीप राऊत, जगदीश शिंदे, यांनी केले.

`यापूर्वी पंढरीची वारी अशीच थ्री. डी. रांगोळी चित्रकृती स्वरुपात दोनवेळा साकारली होती. त्यास आठवडाभर भेट देत वारकरी, नागरीक, रसिकांनी भरभरुन कौतुक केले होते. तर राहटणीला पायऱयांवर 4,000 चौ. फुटांचे थ्री. डी. रांगोळी चित्रकृती केली होती. या थ्री. डी. रांगोळी चित्रकृतींमुळे गोव्याला राष्ट्रीय पुरस्कार एका संस्थेने दिला.`

- सोमनाथ भोंगळे, रंगावलीकार, सासवड, ता. पुरंदर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

SCROLL FOR NEXT