पुणे

संगमनेर अमृतवाहिनी बातमी

CD

GHR२६A०९२००

संगमनेर- येथील अमृतवाहिनी विद्यापीठाच्या प्रारंभ सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात.

‘एक दिवस देशात अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव राहील’

बाळासाहेब थोरात; ४९ वर्षांच्या शैक्षणिक तपश्चर्येला विद्यापीठाची फलश्रुती

संगमनेर, ता.२०: ‘ शिक्षणाचे एक वेगळे विश्व आपल्याला निर्माण करायचे आहे. संगमनेरचा नावलौकिक वाढविणारे विद्यापीठ उभे करायचे आहे. विद्यार्थ्यांना आपण कडक शिस्त लावतो. त्यामुळेच विद्यार्थी घडत आहेत. एक दिवस देशात संगमनेर विद्यापीठाचे नाव निश्चितपणे राहील, यासाठी आपण प्रयत्न करणार असून सर्वांची साथ आवश्यक आहे.’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अमृत कला मंच येथे अमृतवाहिनी विद्यापीठाचा शानदार प्रारंभ सोहळा झाला. यावेळी थोरात बोलत होते. त्यांच्या हस्ते दूरस्थ नियंत्रणाद्वारे अमृतवाहिनी विद्यापीठाच्या फलकाचे, तसेच संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधव कानवडे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, डॉ. रोहित डुबे, पांडुरंग घुले, लक्ष्मण कुटे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, सिनेअभिनेत्री इशिता शर्मा, सुधाकर जोशी, तुळशीनाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, डॉ. जे. बी. गुरव यांच्यासह विविध पदाधिकारी व प्राचार्य उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सह्याद्री बहुजन शिक्षण संस्थेची स्थापना केली. विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षण मिळावे, यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. गेल्या ४९ वर्षांच्या वाटचालीत अमृतवाहिनी संस्थेचा वटवृक्ष झाला असून, गुणवत्तेच्या जोरावर संस्थेने देशभर लौकिक निर्माण केला आहे. अमृतवाहिनीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपासून कृषी महाविद्यालय सुरू झाले असून, आता अन्नतंत्रज्ञानाचे महाविद्यालयही सुरू झाले आहे. राज्यभरातील पालक आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी शासकीय महाविद्यालयांनंतर अमृतवाहिनीला प्राधान्य देत आहे.

यावेळी डॉ. निंबाळकर यांनी अमृतवाहिनी विद्यापीठाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी आभार मानले.
कार्यक्रमास अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकार व शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध विभागांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोट-
मुख्यमंत्र्यांच्या होकाराने
विद्यापीठाचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केवळ संदेश पाठवून ‘मला विद्यापीठ करायचे आहे, मदत करा,’ अशी विनंती केली. त्यांनी तत्काळ होकार दिला. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन विनंती केली. पुढे मंत्रिमंडळात अमृतवाहिनी विद्यापीठासाठी ठराव झाला. विधानसभेत विद्यापीठाचा ठराव चर्चेला आला, तर विधानपरिषदेत दोन तास चर्चा झाली. त्याची नोंदही उपलब्ध आहे. त्यानंतर विद्यापीठाला मंजुरी मिळाली.
बाळासाहेब थोरात, माजी महसूलमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

SCROLL FOR NEXT