लोगो
फोटो - PNE26W43853
...
आनंदऋषीजी ब्लड सेंटरकडून
थॅलेसिमिया रुग्णांना जीवदान
मुरलीधर कराळे ः सकाळ वृत्तसेवा
अहिल्यानगर, ता. २१ ः थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी गरज असते. त्यांना मोफत रक्त पुरवठा करण्याची जबाबदारी सर्वच रक्तपेढीच्या माध्यमातून होत असली, तरी येथील आनंदऋषीजी ब्लड सेंटरकडून मोठ्या प्रमाणात रुग्णांना साह्य केले जाते.
२८ मार्च २०१० रोजी आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्य स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन आनंदऋषीजी हॉस्पिटल संचलित आनंदऋषीजी ब्लड सेंटरचे उदघाटन करण्यात आले. २४ तास सेवा व गरजू रुग्णांना अल्पदरात रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचे रक्त व रक्त घटक आनंदऋषीजी ब्लड सेंटर येथे उपलब्ध करून देण्यात आले. जैन सोशल फेडरेशन नेहमीच गरजू व गरीब रुग्णांना आधार देण्यासाठी तत्पर असते. आनंदऋषीजी हॉस्पिटल २६० बेडचे आहे. त्यामार्फत सहा बेडचे मोफत आनंदऋषीजी थॅलेसिमिया सेंटर चालवले जाते. त्यामध्ये ११० रुग्णांची नोंदणी झाली आहे. त्यांना नेहमीच सेंटरमध्ये रक्त मोफत दिले जाते. या हॉस्पिटलमार्फत अनेक रुग्णांसाठी विविध सेवा सुरू असतात.
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून जिल्हाभरातील रुग्णांना अत्यल्प दरात व प्रसंगी मोफत उपचार केले जातात. जिल्ह्यात रक्तपिशव्यांची मोठी चणचण असते. त्यासाठी रक्तपेढीच्या माध्यमातून विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे भरविली जातात. सामाजिक संस्था, संघटना, महाविद्यालये आदी ठिकाणी रक्तसंकलनाचे नियोजन केले जाते. रक्तदानाची चळवळ वाढली पाहिजे. थॅलेसिमिया रुग्णांना रक्ताची मोठी गरज असते. ती भागविण्यासाठी, त्यांना जीवदान देण्यासाठी युवकांनी रक्तदान चळवळीत सहभाग घेतला पाहिजे. बहुतेक सर्वच रक्तपेढीमध्ये अशी चळवळ वाढीसाठी स्वतंत्र टीम कार्यरत असते. आनंदऋषीजी रक्तपेढीच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव आहे. युवकांनी आपल्या मंडळाच्या माध्यमातून इतर उपक्रमांबरोबरच रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. त्यासाठी या पेढीची टीम कायम सक्रिय आहे. रक्तपेढीशी संपर्क केल्यानंतर सर्व व्यवस्था केली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त संस्थांनी या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. कंपन्यांमध्येही जनजागृती होऊन संबंधित व्यवस्थापनाने असे शिबिरांचे आयोजन करावेत, अशी अपेक्षा आहे.
संपर्क ः ९९७५३९२६५०.
कोट
...
फोटो - PNE26W43852
आनंदऋषीजी ब्लड सेंटरने जिल्ह्यामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक गरजू लाखो रुग्णांना जीवदान देण्याचे काम या सेंटरच्या माध्यमातून केले जाते. भविष्यातही अशीच रक्तसेवा निर्विघ्नपणे चालू ठेवण्यासाठी अनेक रक्तदात्याचे सहकार्य लाभत आहेत.
- सुनील महानोर, जनसंपर्क अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.