collector office pune sakal
पुणे

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्ती

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मंगळवारी नियुक्ती आदेश वाटप

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षेत असलेल्या १६ उमेदवारांना एकाच वेळी शिपाई पदाच्या नियुक्तीचा आदेश देत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलासा दिला आहे. जिल्हा प्रशासनाने नियुक्ती आदेश दिल्यामुळे उमेदवारांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मंगळवारी नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी संजय तेली या वेळी उपस्थित होते.

राज्य सरकारच्या आदेशानुसार एकूण रिक्त पदाच्या २० टक्के नियुक्त्या या अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना द्यायच्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने २०११ पासूनच्या अनुकंपा पदासाठी यादीतील क्रमानुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील ७८ रिक्त पदांपैकी २० टक्के उमेदवारांची शिपाई पदासाठी निवड करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचे आदेश ३१ मार्चपूर्वी देण्याचे राज्य सरकारचे आदेश होते. त्यानुसार गतीने प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उमेदवारांना सोईनुसार नियुक्ती आदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या उमेदवारांनी चांगले कार्य करून पदोन्नतीसाठी प्रयत्न करावेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT