पुणे

सुरक्षेचे निकष धाब्यावर अरबी समुद्रातील दुर्घटना

अमित गोळवलकर

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी सोहळ्यासाठी जाणाऱ्या ज्या स्पीड बोटीला अपघात झाला, त्या बोटीचा चालक जीवरक्षकांच्या काही निकषांमध्ये बसू शकत नव्हता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघात घडला त्या दिवशी दुपारी तीनपर्यंत हा चालक जीवरक्षण प्रशिक्षणात होता. ते संपल्यानंतर लगेच त्याला स्पीड बोटीवर संबंधित कंपनीने पाठवले होते. दरम्यान, अपघातग्रस्त बोटीवर वायरलेस सेटही नव्हता, अशीही माहिती समोर येत आहे. 

अरबी समुद्रात बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. त्यात सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बोट ही अलिबागच्या "एमआरएम मरिन्स' या कंपनीची आहे. या कंपनीच्या काही नौका पोट कराराने आशिम मोंगिया या माजी नौदल अधिकाऱ्याच्या कंपनीला चालविण्यासाठी दिल्या आहेत. अपघातग्रस्त बोटही याच कंपनीची होती. 

पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी ही बोट महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने भाड्याने घेतली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार "राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटी'च्या वतीने (आरएलएसएस) संबंधित बोट कंपनीच्या चालकांसाठी जीवरक्षक प्रशिक्षण मुंबईत सुरू होते. बुडणाऱ्यांना वाचविण्यासह विविध प्रकारचे प्रशिक्षण आरएलएसएसकडून दिले जाते. तसेच लेखी परीक्षाही घेतली जाते. अपघातग्रस्त बोटीचा चालक रुचीत साखरकर याचाही या प्रशिक्षणात सहभाग होता. तो 31 वर्षांचा असून, गेली दहा वर्षे तो स्पीड बोट चालवतो. अपघातग्रस्त स्पीड बोट तो गेल्या तीन वर्षांपासून चालवत होता. 

आरएलएसएसचे व्यवस्थापक देबांशू दास हे प्रशिक्षण देत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साखरकर व अन्य दोन तीन जण पोहण्याबाबतच्या निकषात बसत नव्हते. त्यांना अपघाताच्या आदल्या दिवशी याची कल्पना दिली होती. प्रशिक्षण व लेखी परीक्षा संपल्यानंतर संबंधित कंपनीला आरएलएसएसकडून अहवाल उत्तीर्ण-अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थींचा अहवाल देण्यात येतो. मात्र, अपघातामुळे हे प्रशिक्षणच थांबवावे लागल्याचे दास यांनी स्पष्ट केले. तरीही झालेल्या प्रशिक्षणाचा अहवाल लवकरच देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

अपघाताच्या दिवशी दुपारी तीन वाजता प्रशिक्षण संपले. दुसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण अवघड असल्याने मी प्रशिक्षणार्थींना घरी जाऊन विश्रांती घेण्यास सांगितले. मात्र सायंकाळी एका बोटीला अपघात झाल्याचे व त्याचा चालक एक जीवरक्षक प्रशिक्षण शिबिराचा प्रशिक्षणार्थी असल्याचे समजले. 
-देबांशू दास, व्यवस्थापक, आरएलएसएस. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT