Pune Crime esakal
पुणे

Pune Crime: राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांच्या चुलतभावाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

पुणे शहरातील एका राजकीय नेत्याच्या चुलतभावाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तडीपार गुंडाला वानवडी पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील एका राजकीय नेत्याच्या चुलतभावाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तडीपार गुंडाला वानवडी पोलिसांनी अटक केली. श्रीधर उर्फ सोन्या विठ्ठल शेलार (वय ३५, रा. शांतीनगर, वानवडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलार हा सराईत गुन्हेगार असून, त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. शेलार याचा अभिजित जगताप यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून शेलार याने त्यांना फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वानवडी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

आरोपी शेलार हा दारूच्या नशेत हत्यारासह वानवडी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार शेलार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, उपनिरीक्षक संतोष सोनवणे, अतुल गायकवाड, हरिदास कदम यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस अंमलदार महेश गाढवे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Law: 1 तास काम, 2 तासांचा पगार! काय आहे ओव्हरटाइमवर नवीन कामगार कायद्यातील नियम

Canva AI 2.0 लॉन्च! डिझाइनिंग वर्ल्डमध्ये धमाका; 20 पेक्षा जास्त जबरदस्त टूल्स, कसे वापरायचे? पाहा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, तापमानाचा पारा ४४ अंशावर तरी शाळा सुरूच

IND vs SA: स्मृती मानधानाने रोहित शर्मा-विराट कोहलीला मागे टाकत घडवला नवा इतिहास; T20I मध्ये ठरली अव्वल भारतीय फलंदाज

Kolhapur Gokul Dudh Sangh Clash : दिव्यांग लिपिकाला सभासदांची धक्काबुक्की; 'गोकुळ' सुनावणीला गालबोट; अधिकारी गैरहजर असल्यामुळे तणाव

SCROLL FOR NEXT