assistant engineer of mahavitran msedcl arrested while taking bribe pune crime Sakal
पुणे

Pune Crime : ‘महावितरण’चा सहायक अभियंता लाच घेताना ताब्यात

पडताळणी केल्यानंतर बाणेर कार्यालयात सापळा रचून कानडे याला लाच स्वीकारताना ताब्यात घेतले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्युत ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ‘महावितरण’च्या बाणेर उपकेंद्रातील सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ताब्यात घेतले. रवींद्र नानासाहेब कानडे (वय ३७) असे अधिकाऱ्याचे नाव आहे. ‘एसीबी’च्या पथकाने शुक्रवारी (ता.१) बाणेर येथील कार्यालयाच्या आवारात ही कारवाई केली.

तक्रारदार हे सरकारी विद्युत ठेकेदार आहेत. त्यांना आर.एम.सी. प्लांटसाठी विद्युत पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले होते. या कामाच्या पूर्णत्वाचा दाखल्यासाठी सहायक अभियंता कानडे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदार यांनी ‘एसीबी’ कार्यालयात अर्ज दिला होता. त्याची पडताळणी केल्यानंतर बाणेर कार्यालयात सापळा रचून कानडे याला लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. याबाबत चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT