सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : शहजाद भट्टी आणि सरफराज सरदार यांच्या ग्रुपशी काही व्यक्तींचा संपर्क आल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर छापेमारी मोहीम राबविली. नाशिक शहर व जिल्ह्यातही विविध ठिकाणी छापे टाकून संशयित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात आली. यात एका महिलेसह एका तरुणाचा समावेश होता. मात्र, चौकशीत दोघांचाही कोणत्याही संशयास्पद कारवायांशी प्रत्यक्ष संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एटीएस पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सर्वप्रथम शहरातील गोळे कॉलनी परिसरातील एका महिलेची चौकशी केली. तिच्याकडून आक्षेपार्ह अथवा संशयास्पद असे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे प्राथमिक चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले. यानंतर सुरगाणा येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेऊन सुरगाणा पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्याच्या मोबाईलची तपासणीही करण्यात आली. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद माहिती आढळून आली नाही. चौकशीत संबंधित तरुणाने इंस्टाग्रामवर रील पाहताना ऑनलाइन गेमच्या लिंकवर चुकून क्लिक झाल्याने त्याचा अप्रत्यक्षरीत्या संबंधित ग्रुपशी संपर्क आल्याचे सांगितले. तपासानंतर त्याचा कोणत्याही गैरप्रकाराशी संबंध नसल्याची खात्री झाल्यानंतर त्यालाही सोडून देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.