पुणे

कागदपत्रावर स्वाक्षरी न केल्याने माजी सपरंचाला मारहाण

CD

कागदपत्रावर स्वाक्षरी न केल्याने माजी सरपंचाला मारहाण
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ ः कागदपत्रावर स्वाक्षरी न केल्याने एकाने सळईने माजी सरपंचावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. शनिवारी (ता. २२) सकाळी नऊच्या सुमारास देवडी (ता. मोहोळ) येथे ही घटना घडली. अंकुश बाळू शिंदे (वय ५०, रा. देवडी) असे माजी सरपंचाचे नाव आहे.
अंकुश शिंदे गावातील दूध संकलन केंद्राजवळ थांबले होते. त्यावेळी धनाजी मारुती नाईकवाडी याने काही कागदपत्रे देऊन त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. माझी सरपंचपदाची मुदत संपली असून ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. त्यामुळे मी स्वाक्षरी करू शकत नाही, असे शिंदे यांनी सांगितले. त्यावर चिडून धनाजी याने सळईने व लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. त्यात डाव्या डोळ्याला मार लागून ते जखमी झाले. तसेच मुकामार लागला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT