savitiribai phule pune university sakal
पुणे

Pune News : स्वायत्त महाविद्यालयांनी थकविले कोट्यवधी रुपये; विद्यापीठाचा कारवाईचा इशारा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून स्वायत्त झालेल्या बहुतेक महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपयांचे परीक्षा शुल्क थकविण्याची धक्कादायक बाब आली समोर.

सम्राट कदम

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून स्वायत्त झालेल्या बहुतेक महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपयांचे परीक्षा शुल्क थकविण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यापीठाने पाठपुरावा करूनही थकीत शुल्क जमा न केल्यामुळे आता व्यवस्थापन परिषदेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाशी संलग्न पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील बहुतांश सर्व नामांकित महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयांना त्याच्या स्तरावर परीक्षा घेण्याचे आणि निकाल घोषित करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. मात्र, महाविद्यालये स्वायत्त झाली तरीही विद्यार्थ्यांचा डेटा विद्यापीठाकडे ठेवावा लागतो.

विद्यार्थ्यांच्या पदवीवर विद्यापीठाचा लोगो आणि नाव असते. त्यामुळे नियमानुसार महाविद्यालयांनी विद्यापीठाला शुल्क देणे अपेक्षित आहेत. तशी तरतूदही महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात करण्यात आली आहे. मागील दहा वर्षांपासून काही महाविद्यालयांनी विविध प्रकारचे शुल्क जमा केले नसल्याचे दिसून येत आहे. तर काही महाविद्यालयांनी नियमानुसार शुल्क विद्यापीठाकडे जमा केले आहे.

दिवसेंदिवस स्वायत्त महाविद्यालये आणि त्यांच्या थकीत शुल्काची संख्या वाढत चालली असून, आता ती कोट्यवधींच्या घरात आहे. त्यामुळेच विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाला पत्र पाठवून शुल्क भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. तसेच शुल्क थकविणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाविद्यालयांना स्वायत्तता देतानाच परीक्षासंबंधातील शुल्काशी नोंद कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यापीठाला निश्चित केलेले शुल्क देणे बंधनकारक आहे. अशा महाविद्यालयांनी थकीत शुल्क जमा केले नाही तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषद घेईल.

- रवींद्र शिंगणापूरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger 4 : ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का ! १४ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? शिवसेनेच्या आमदाराचा मोठा दावा

Rahul Gandhi: ‘एमपीएससीवर भाजपचा कब्जा, विश्वासार्हता उद्ध्वस्त’; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

अर्थबोध : ‘जीडीपी’च्या आकडेवारीचे वास्तव काय?

म्युच्युअल फंड : लाइफ सायकल फंड : उद्दिष्टपूर्तीचे साधन

आजचे राशिभविष्य - ०७ सप्टेंबर २०२६

SCROLL FOR NEXT