तुर्किये, पाकिस्तानमध्ये ‘बद्र करार’
कतार, इंडोनेशियाचाही सहभाग; लष्करी सहकार्यावर भर
अंकारा, ता. २१ (वृत्तसंस्था) : संरक्षण सहकार्याबरोबर संरक्षण क्षमतांना बळकटी देण्यासाठी तुर्किये, पाकिस्तान, कतार आणि इंडोनेशिया या देशांनी बुधवारी सहकार्य करारावर सह्या केल्या.
‘बद्र करार’ असे या कराराचे नामकरण रकण्यात आले असून, दोहा येथे या करारावर सह्या करण्यात आल्याचे तुर्कियेच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. ‘या कराराला लक्षणीय आर्थिक महत्त्व आहे. या करारामुळे लष्करी उत्पादनातील सहकार्य वाढेल, लष्करी क्षमतांना चालना मिळेल आणि लष्करी प्रशिक्षण, संशोधन, विकासाच्या तांत्रिक सहकार्याला मदत मिळेल. प्रत्येक देशाच्या लष्करी उत्पादनातील अद्वितीय क्षमतांचा उपयोग करून, या उपक्रमाद्वारे परस्पर सहकार्य आणि एकात्मता वाढवली जाईल, संरक्षण उत्पादन क्षमता बळकट केली जाईल, तसेच मित्रराष्ट्रे आणि सहकारी देशांच्या गरजा पूर्ण करणे शक्य होईल,’ असा विश्वास या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
तुर्कियेचे वाढते महत्त्व
तुर्कियेकडे ‘नाटो’ संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. तसेच, तुर्कियेचा संरक्षण उद्योगही मोठा आहे. इराण युद्धामध्ये तुर्कियेकडून आखाती देशांना लष्करी मदत करण्यात आली असून, कतारमध्ये तुर्कियेचा लष्करी तळही आहे. याशिवाय, ऑगस्टमध्ये तुर्किये, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये लष्करी करार झाला होता. यामध्ये एका देशावर झालेला हल्ला तिन्ही देशांवरील हल्ला असे मानण्यात येत होते. याशिवाय, तुर्किये आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये संरक्षण सहकार्य वाढत आहे. ‘बद्र करारा’मुळे या देशांमधील संरक्षण उद्योगांमधील सहकार्य वाढेल, यातून सुरक्षेला चालना मिळेल, अशा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भारतावर परिणाम
- तुर्कियेकडून पाकिस्तानला ड्रोन व अन्य तंत्रज्ञान मिळू शकते
- कतारकडे आर्थिक बळ असून, पाकिस्तानच्या सैन्याला आधुनिकीकरण व संरक्षण उद्योगाला त्याचा फायदा बळ मिळेल
- मक्का कराराला पूरक करार म्हणूनही या कराराकडे पाहिले जात आहे
- भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ या धोरणामध्ये इंडोनेशिया हा महत्त्वाचा देश असताना, त्यांचा या करारातील सहभाग भारतासाठी अडचणीचा ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.