पुणे

बॅंकांनो, युवकांवर लक्ष केंद्रित करा

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १८ : केंद्र सरकार पाठोपाठ आता बॅंकांनीही ‘जेन-झीं’वर लक्ष केंद्रित करण्याची तयारी चालविली आहे. याचाच भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दोन ऑक्टोबरपासून ‘बँकिंग फॉर युथ’ ही मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून तरुणांशी केवळ खाते उघडण्यापुरते संबंध न ठेवता, त्यांच्या शिक्षणापासून करिअर, उद्योजकता, गुंतवणूक आणि संपत्ती निर्मितीपर्यंत दीर्घकालीन बँकिंग संबंध निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
सरकारी बॅंकांची शिखर परिषद म्हणविल्या जाणाऱ्या ‘पीएसबी कॉन्फ्लुएन्स २०२६’च्या समारोप प्रसंगी सीतारामन यांनी सरकारी बॅंकांना आवाहन करताना तरुणाईला बॅंकींग क्षेत्राशी जोडण्याचे आणि त्यासाठी ‘बॅंकींग फॉर युथ’ मोहीम सुरू करण्याचे सुचविले आहे. वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) आणि इंडियन बँक्स असोसिएशनच्या (आयबीए) समन्वयातून ही मोहीम राबवता येईल, असेही त्या म्हणाल्या. ‘‘तरुण ग्राहक बँकेच्या शाखेत येतील, याची वाट न पाहता बँकांनी महाविद्यालये, विद्यापीठे, कौशल्य विकास संस्था आणि अन्य शैक्षणिक परिसरांमध्ये थेट पोहोचावे. ‘बँकिंग फॉर यूथ’ हा केवळ महिनाभराचा उपक्रम न राहता दीर्घकालीन बँकिंग संबंध निर्माण करणारा कार्यक्रम असावा. १६ ते १८ वयोगटात निर्माण झालेले बँकिंग संबंध पुढे शिक्षण, रोजगार, उद्योजकता, घराची मालकी, गुंतवणूक आणि संपत्ती निर्मिती अशा विविध टप्प्यांपर्यंत विकसित होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांच्या जीवनप्रवासासोबत बँकांनीही पुढे जाणे आवश्यक आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी प्राधान्य क्षेत्रातील कर्जपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, मुद्रा योजनेचे लाभार्थी, दुर्बल घटक आणि वंचित समुदायांना वेळेवर, पुरेसे आणि उत्पादक कर्ज मिळते आहे का, यावर भर दिला पाहिजे. कृषी कर्जपुरवठ्यात कडधान्ये आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना अधिक कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी बँकांना दिले.

सीतारामन यांच्या सूचना
- बँकेच्या शाखांमध्ये ‘युवा किऑस्क’ किंवा ‘युवा बँकिंग मित्र’ ही संकल्पना राबवावी
- वेब आणि मोबाईलसाठी अनुकूल पोर्टल विकसित करावे
- बँकेची जवळची शाखा शोधण्याची सुविधाही त्यात असावी
- स्मार्टफोनच्या युगात वाढलेल्या तरुणांच्या अपेक्षांशी जुळवून घेत सुविधांमध्ये बदल करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : बीड जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार! ​सिझेरियन करताना पोटातच सोडले ग्लोज; आतडे सडले अन् गर्भाशय काढावे लागले; १९ वर्षीय माता मरणाच्या दारात

Degloor Crime : अंध विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी ॲट्रॉसिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा

YouTube वर आता Views चा खेळ बदलणार! २४ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, नेमका काय झालाय बदल?

Mumbai Local : रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा! लोकलच्या डब्यावर चढण्याच्या प्रयत्नात ओएचईचा धक्का, घाटकोपरमध्ये लोकल १९ मिनिटे खोळंबली

Marathi News Live : क्रिकेट बुकीच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT