Bhakti Gawade sakal
पुणे

Bhakti Gawade : बारामतीच्या भक्तीची राष्ट्रीय स्तरावर थाळीफेकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी

बारामती - येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची विद्यार्थीनी भक्ती गावडे हिने 45.10 मीटर थाळीफेक करत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

मिलिंद संगई

बारामती - येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची विद्यार्थीनी भक्ती गावडे हिने 45.10 मीटर थाळीफेक करत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने चंद्रपूर विभागाअंतर्गत विसापूर बल्लारशाह येथे झालेल्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत भक्ती गावडे हिने या यशाला गवसणी घातली आहे.

राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी तिची थाळीफेक या क्रीडा प्रकारासाठी राज्याच्या संघात निवड झाली होती. यास्पर्धेत 28 राज्यातील संघांनी सहभाग घेतला होता. भक्ती गावडे हिने 19 वर्षे वयोगटातून शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. तामिळनाडू मध्ये होणा-या राष्ट्रीय खेलो इंडिया युथ गेम्स मैदानी स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

डॉ. गौतम जाधव व अशोक देवकर यांनी तिला मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सचिव मिलिंद वाघोलीकर, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khan Sir Patna Controversy: पोलिसांनी रात्रभर घेतला शोध, खान सर पळत राहिले; कोचिंग गुरूला अटक होणार? की न्यायालयात आत्मसमर्पण?

कारने धडक देताच दुचाकीवरील चौघे हवेत उडाले, चिमुकलीसह चौघांचाही जागीच मृत्यू; घटनास्थळी रक्ताचा सडा

IND VS PAK: भारताचा पाकिस्तानवर हॉकीत रोमहर्षक विजय; आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

माधुरी आणि श्रीदेवीमध्ये 'या' कारणामुळे होतं कट्टर वैर? चर्चांवर स्पष्टच बोलली होती माधुरी, म्हणाली...'त्या अशा लोकांपैकी एक होत्या ज्या...'

शालिनी-महेंद्रच्या लग्नात येणार विघ्न, प्रतापरावामुळे नात्याचं सत्य येणार सर्वांसमोर!

SCROLL FOR NEXT