Corona Test sakal
पुणे

कोरोनात बारामतीकरांमुळे आरोग्य विभाग टेन्शनमध्ये!

आरोग्य विभागाच्या 'या' समारंभांवर मर्यादा आणण्याची सूचना

मिलींद संगई

बारामती : लग्नसमारंभ व त्यातील जेवणावळींमुळे बारामती (bamarati) शहर व तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज असून या समारंभांवर मर्यादा आणण्याची सूचना करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात बारामतीची पॉझिटीव्हीटीचा दर पाच टक्क्यांच्या आत असला तरी रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. कोरोनाची भीती कमी झाल्यामुळे प्रवास करणा-यांची संख्याही वाढू लागल्याने संसर्ग वाढू लागल्याचे दिसत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

लग्नसमारंभ व त्या नंतर होणा-या जेवणावळी कोरोनासंसर्गाचे प्रमुख कारण असल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. जेवण करताना मास्क काढला जातो, परस्परांच्या संपर्कात लोक जवळून येतात, त्या मुळे जेवणावळींवर बंदी यायला हवी, अशी सूचना आता होते आहे.

प्रवास टाळायला हवा अशीही आरोग्य विभागाची सूचना असून अगदीच आवश्यक असेल तरच प्रवास करा, प्रवास करतानाही पुरेशी काळजी घ्यायला हवी कारण अनेकांचा संसर्ग हा बाहेरगावाहून प्रवास करुन आल्यानंतर झाल्याचे तपासणीत निष्पन्न झालेले आहे. ग्रामीण भागात रॅपिड अँटीजेन तपासण्यांची संख्या लक्षणीय आहे, नगरपालिकेस मुख्याधिकारीच नसल्याने शहरातील तपासण्यांची संख्या मात्र नगण्य आहे. शहरातही तपासण्या वाढविणे नितांत गरजेचे असून ग्रामीणच्या तुलनेत शहरात तपासण्यांबाबत उदासिनताच आहे.

नागरिकांनी त्रिसूत्री पाळावी....

नागरिकांनी स्वताःहूनच मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनेटायझरचा सततचा वापर ही त्रिसूत्री पाळली तर कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल. खूपच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा, लग्नसमारंभांसह इतर गर्दीच्या समारंभांना जाण्याचे टाळले पाहिजे- डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT