Baramati Jail 
पुणे

Baramati Jail : बारामतीच्या जिल्हा कारागृहास आता वर्ग तीनचा दर्जा; राज्य शासनाचा अध्यादेश जारी

Baramati Jail : येथील गृहविभागाच्या सबजेलच्या बांधकामासाठी राज्य शासनाने 14 कोटी 96 लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजूरी दिली आहे

मिलींद संगई

बारामती, ता. 26- येथील गृहविभागाच्या सबजेलच्या बांधकामासाठी राज्य शासनाने 14 कोटी 96 लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजूरी दिली असून या पुढील काळात बारामतीच्या जिल्हा कारागृहाचा दर्जा दोन ऐवजी तीन असेल. या संदर्भात राज्य शासनाने अध्यादेश जारी केला असून आता शासननिर्णयानुसार बारामती शहर सबजेल या कारागृहास या पुढील काळात बारामती जिल्हा कारागृह वर्ग दोन ऐवजी वर्ग तीन घोषित करण्यात आले आहे.

या बाबतच्या शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक २६.४.२०२३ च्या शासन निर्णयान्वये "बारामती शहर, सबजेल" या कारागृहास "बारामती जिल्हा कारागृह वर्ग-२" असे घोषित करण्यात आले.

कारागृहातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कारागृह परिसरातील अधिकारी/कर्मचारी यांना तातडीने कर्तव्यावर बोलावून परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता कारागृह नियमावलीतील तरतुदीनुसार कारागृह परिसरातच शासकीय निवासस्थान असणे आवश्यक असल्याने, सदर कारागृहाची बंदी क्षमता कमी करुन निवासस्थाने देखील याच भुखंडामध्ये बांधण्यात येणार आहेत.

त्यामुळे, आता बारामती जिल्हा कारागृह वर्ग-२ ची बंदी क्षमता 130 इतकी होणार असल्याने सदर कारागृहास बारामती जिल्हा कारागृह वर्ग-3 म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव कारागृह विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडून शासनास प्राप्त झाला होता. त्यानुषंगाने, 26 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयामध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : जुन्नर तालुक्यात खरीप पिकांचे पंचनामे आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT