पुणे

बारामतीत ५५ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे रोपण

CD

बारामती, ता. २२ : भारत विकास परिषद आणि स्व-आधार केंद्राच्या वतीने बारामतीतील ५५ दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम अवयव मोफत बसविण्यात आले. तसेच, त्यांना कृत्रिम अवयवांचा वापर करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. म.ए.सो. विद्यालय येथे रविवारी (ता. १८) हा उपक्रम राबविण्यात आला.
भारत विकास परिषदेच्या दक्षिण पुणे व पिंपरी-चिंचवड शाखांतर्फे आणि दक्षिण पुणे सेवाभावी न्यासाच्या स्व-आधार, पुणे केंद्रामार्फत या शिबिराचे आयोजन केले होते. यापूर्वी ३० ऑगस्ट २०२६ रोजी लाभार्थ्यांचे मोजमाप घेण्यासाठी शिबिर झाले होते. उद्योजक तेजस शहा आणि भारत विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले.
भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय महालेखापरीक्षक किशोर गुजर यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. शिबिराचे प्रमुख प्रायोजक तेजस शहा यांनी अशा उपक्रमांमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी मदत मिळत असल्याचे सांगितले. स्व-आधार केंद्राच्या तंत्रज्ञ पथकाने लाभार्थ्यांना कृत्रिम हात-पाय बसवून त्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. या वेळी स्थानिक उद्योजक अक्षय डांगे व नगरसेविका अनुप्रीता डागे, परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष शशिकांत पदमवार आणि दक्षिण पुणे शाखाध्यक्षा मंजूषा गोगटे यांच्यासह विविध पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. शिबिरासाठी दक्षिण पुणे व पिंपरी-चिंचवड शाखांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. रामचंद्र एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ

SCROLL FOR NEXT