Tree 
पुणे

रस्तारुंदीकरण घेणार 3300 झाडांचा बळी ?

ज्ञानेश्वर रायते

बारामती (पुणे) : नीरा-बारामती रस्त्याचे रुंदीकरण या रस्त्यावरील 50 किलोमीटर अंतरातील अनेक वर्षे वयाच्या चिंचेच्या, वडाच्या व जांभळाच्या 3300 झाडांचा बळी घेणार काय, या प्रश्नाने निसर्गप्रेमी अस्वस्थ आहेत. या रस्त्याच्या मध्यापासून 12 मीटरपर्यंतच्या झाडांची माहिती मागविण्यात आल्याने ही अस्वस्थता आणखीच वाढली आहे.

नीरा-बारामती या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी झाडांचे मूल्यांकन सुरू आहे. या रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी अगदी शंभर वर्षांहूनही अधिक वयाची आहेत. आता रस्त्याचा विकास या झाडांचा बळी घेऊन थांबेल, अशी चिन्हे आहेत. सरकारने या रस्त्यावरील झाडांचे सर्वेक्षण केले असून, मोठ्या 3300 झाडांचे मूल्यांकन करण्यासही प्रारंभ केला आहे. वनविभागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अगोदर मध्यापासून दोन्हीकडे 12 मीटर व त्यानंतर काही दिवसांपूर्वी आठ मीटर अंतरावरील झाडांच्या सर्वेक्षणाची व मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे. एकंदरीत या रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे कितीतरी वर्षांची आहेत.

या झाडांपैकी जांभळाची झाडे पुनरुज्जीवित करता येणार नाहीत. मात्र, वडाची झाडे पुनःस्थापित करता येऊ शकतात. त्या दृष्टीने प्रयत्न करूनही झाडे नव्याने लागवड करण्यासाठी अगोदर प्रयत्न करावा; अन्यथा या भागातील असलेली ही मोठी नैसर्गिक देणगी आपण कायमची गमावू, अशी चिंता पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत. सध्या या झाडांना क्रमांक देण्यात आले असून या रस्त्याची रुंदी निश्‍चित झाल्यानंतर या झाडांचे भवितव्य ठरणार आहे. अर्थात, 12 किंवा 8 मीटर झाले तरी ही झाडे धोक्‍यातच येणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही मत आहे.


ब्राझीलमधील ऍमेझोनच्या जंगलाचे वास्तव समोर आहे. उन्हाळ्यात वाढणारे तापमान आपल्यासमोर आहे. बारामती-नीरा रस्त्यावर वटवाघळाच्या प्रजाती राहतात. या साऱ्यांचा विचार झाला पाहिजे. विकास जरूर झाला पाहिजे. मात्र, तो करताना निसर्गाचीही अपरिमित हानी होणार नाही याकडे लक्ष द्यावे, कारण एक चांगले झाड तयार होण्यास कितीतरी वर्षे लागतात. आपण कितीतरी वर्षांची निसर्गाने दिलेली देणगी संपविणार आहोत, त्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
डॉ. महेश गायकवाड, निसर्ग अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT