toll naka sakal
पुणे

Baramati News : बारामतीकरांवर काही दिवसात पडणार टोलचा दुहेरी भुर्दंड....

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे पाटस ते बारामती दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसात या रस्त्यावर टोलआकारणीस प्रारंभ होणार आहे.

मिलिंद संगई

बारामती - संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे पाटस ते बारामती दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसात या रस्त्यावर टोलआकारणीस प्रारंभ होणार आहे. या मुळे बारामतीकरांवर दुहेरी टोलचा भुर्दंड पडणार आहे.

पुणे सोलापूर रस्त्यावरील पाटस टोल नाका ते बारामतीनजिक उंडवडी येथे होणारा टोल नाका यात फक्त वीस कि.मी.चेच अंतर असून दुहेरी टोल ही टोलआकारणी बारामतीकरांसाठी मात्र डोकेदुखी ठरणार आहे. दुहेरी टोलआकारणीमुळे रस्त्यावरुन प्रवास महागडा ठरणार आहे.

बारामतीहून पुण्याला जाताना रस्ता चांगला व वेगाने अंतर पार करता येते या मुळे अनेक बारामतीकर या रस्त्याचा वापर करत आहेत. बारामतीहून पाटसला अवघ्या वीस मिनिटात अनेक जण पोहोचतात.

तेथून सोलापूर पुणे महामार्गावरुन सव्वा तासात हडपसरपर्यंत जाता येते. या पार्श्वभूमीवर आता उंडवडीनजिक टोलनाका सुरु होणार असल्याने तो व पाटस असा जाताना व येताना मिळून जवळपास तीनशे रुपये टोलसाठी मोजावे लागतील असा अंदाज आहे.

बारामती ते पाटस या रस्त्यावरील टोल अद्याप निश्चित झालेला नसला तरी तो एकाबाजूने प्रवास करताना साठ रुपये इतका असेल असा अंदाज आहे. पाटस टोल नाक्यावरील टोल नव्वद रुपये आहे. याचाच अर्थ बारामतीहून पुण्याला जाताना 150 व परतताना 150 असा तीनशे रुपयांचा टोल भरावा लागेल अशी चिन्हे आहेत.

पाटस टोल नाक्याची जागा बदलावी...

बारामतीकरांना दुहेरी टोलमधून सुटका द्यायची असेल तर पाटस टोल नाक्याची जागा बदलावी लागेल. सध्या बारामतीहून पाटस रस्त्याने सोलापूर पुणे रस्त्याला लागल्यानंतर लगेचच पाटस टोल नाका आहे, त्याची जागा सोलापूरच्या बाजूला सरकवावी लागेल, या मुळे बारामती व इंदापूरकरांवरचा दुहेरी टोलचा भार कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT