Baramati Crime News Sakal
पुणे

Baramati Crime News : बारामतीत सोन्याचे दागिन्यांच्या चोरीने नागरिक चिंताग्रस्त

सोन्याचे दागिने हिसकावणे व हातचलाखीने पळविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने बारामतीकरात चिंतेचे वातावरण आहे. शहरातील अशोकनगरमधील एका ज्येष्ठ महिलेची सोन्याची चेन बुधवारी (ता. 11) चोरट्यांनी हिसकवून नेली. या परिसरातील ही चौथी घटना आहे.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : सोन्याचे दागिने हिसकावणे व हातचलाखीने पळविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने बारामतीकरात चिंतेचे वातावरण आहे. शहरातील अशोकनगरमधील एका ज्येष्ठ महिलेची सोन्याची चेन बुधवारी (ता. 11) चोरट्यांनी हिसकवून नेली. या परिसरातील ही चौथी घटना आहे.

या पूर्वी एक डॉक्टर व एका निवृत्त प्राध्यापकांच्य हातातील अंगठी पोलिस असल्याची बतावणी करुन चोरटयांनी हातचलाखीने लांबवली होती. काल सुनीती सराफ (रा. अशोकनगर, ता. बारामती) अशोकनगरमधील मंदीरातून घरी परतल्या. घराच्या दरवाज्यातच मोटारसायकलवरुन आलेल्या दोन चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील आठ ग्रँम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.

या पूर्वीही याच परिसरात अनेक सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या पैकी किती चो-यांचा तपास झाला, त्यात काय निष्पन्न झाले याची माहिती संबंधित फिर्यादींना मिळालेली नाही. तक्रार नोंदविल्यानंतर काही काळ तपास होतो, पुन्हा त्या चोरीबाबत पोलिसही चकार शब्द काढत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

घटना घडल्यानंतर पोलिसांकडून या घटनेचा काय काय तपास झाला, याची माहिती संबंधित फिर्यांदीना पोलिस ठाण्यात बोलावून द्यायला हवी, ते समजून घेण्याचा त्यांचा अधिकार असतानाही कधीही अशा पध्दतीने तपासाबाबत माहिती दिली जात नाही, अशी फिर्यादींची तक्रार आहे.

या बाबत पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर तपास सुरु आहे इतके मोघम उत्तर कायम दिले जाते. बारामतीतील सोनसाखळी चोरीच्या घटनांच्या तपासाबाबत वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. गणवेशातील पोलिसांची दुचाकीवरुन गस्त असावी, दुचाकीवरुन फिरणा-या, नंबरप्लेट नसलेल्या संशयास्पद व्यक्ती व वाहनांची नियमित तपासणी व्हावी, अशीही नागरिकांची मागणी आहे.

सीसीटीव्हीचा प्रकल्प कागदावरच...

मोठा गाजावाजा केलेला सीसीटीव्हीचा प्रकल्प अजूनही लाल फितीतच अडकून पडला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा सूचना देऊनही गृहविभागाने या प्रस्तावाकडे साफ दुर्लक्ष केल्याने एकही सीसीटीव्ही बारामतीत कार्यान्वित होऊ शकलेला नाही. सीसीटीव्ही असते तर अशा घटनांचा माग काढणे सोयीचे झाले असते, मात्र लाल फितीच्या कारभाराचा मनस्ताप लोकांना सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT