पुणे

बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

CD

बारामती, ता. १७ : कमी पाऊस, वाढता उन्हाळा आणि अल निनोचा संभाव्य प्रभाव लक्षात घेता बारामती शहरातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक सुभाष ढोले यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बारामतीचा पाणी पुरवठा प्रामुख्याने नीरा डावा कालव्यावर अवलंबून आहे. शहरातील चार साठवण तलावांची एकूण क्षमता सुमारे ८५५ दशलक्ष लिटर असून, त्याद्वारे शहराला साधारण २० ते ३० दिवस पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र, कालव्यातून पाणी येण्यास विलंब झाल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्यता आहे. यंदा जून महिन्यातच शहराला एक-दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती.
शहराजवळील जळोची येथील साठवण तलावाशेजारील प्रस्तावित तलावाचे काम अपूर्ण असून, तांदुळवाडी येथील नागवडेवस्ती परिसरातील सुमारे १५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या तलावाचे कामही प्रलंबित आहे. या दोन्ही तलावांची कामे प्राधान्याने पूर्ण केल्यास सुमारे ३२५ दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढून शहराला आणखी दहा दिवस पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

पाणी बचतीसाठी उपाय
-मध्यमवर्गीय पाणी साठवण तलावाजवळ पाटबंधारे खात्याच्या संकल्पनेनुसार यांत्रिक पद्धतीचे गेट बसवावेत. त्यामुळे कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतरही साठवलेल्या पाण्याचा वापर करता येईल.
-शहरातील दोनशेपेक्षा अधिक हापसे (बोअरवेल) सुस्थितीत ठेवावेत, तसेच जुन्या पाच सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढून त्या स्वच्छ कराव्यात.
-खासगी बोअरवेल, विहिरी आणि जलस्रोतांचे अस्तरीकरण करताना होणारा पाण्याचा अपव्यय टाळावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

Dhruv Rathee: सुनावणीपूर्वीच युट्युबर ध्रुव राठी लंडनला रवाना; दिल्लीच्या साकेत न्यायालयाकडून वॉरंट जारी

Latest Marathi News Live Update : पुण्यात राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांसह 10 ते 11 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या चॅम्पियनची 'एक्झिट'! ३ ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या दिग्गजाने सोडली टीमची साथ

FSSAI Notice: ऑनलाइन शॉपिंग करता? Flipkart, BigBasketला FSSAIची नोटीस! खाद्यपदार्थांबाबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT