पुणे

बास्केटबॉल

CD

PNE26W20627
अहिल्यानगर ः बास्केटबॉल सराव शिबिरात मार्गदर्शन करताना भारतीय संघाचे प्रशिक्षक संभाजी कदम समवेत खेळाडू.

बास्केटबॉल शिबिराला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीचा उपक्रम : संभाजी कदम यांचे मार्गदर्शन
अहिल्यानगर, ता. २० : केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एकदिवसीय बास्केटबॉल सराव शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी कर्णधार व प्रशिक्षक संभाजी कदम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

सायंकाळी पार पडलेल्या या शिबिराला नगर शहरातील बास्केटबॉल खेळाडू व क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संभाजी कदम यांनी खेळाडूंना बास्केटबॉलमधील मूलभूत कौशल्ये, शारीरिक तंदुरुस्ती, खेळातील शिस्त आणि संघभावना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव कथन करत उपस्थित खेळाडूंना प्रेरणाही दिली.
या कार्यक्रमास ऊर्जा गुरुकुलच्या संचालिका कल्याणी फिरोदिया, संभाजी कदम अकॅडमीचे संस्थापक शरद नागणे, प्रशिक्षक गणेश नागणे व धनंजय नखले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष बाबासाहेब कोतकर, खजिनदार रोहिणी कोतकर, प्रशिक्षक छबुराव कोतकर व स्वाती बाराहाते यांनी केले. ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसचे प्रसाद जमदाडे, डॉ. देवेश कुमार बाराहाते, एबीसी क्रीडा मंडळाचे चंद्रशेखर म्हस्के, मुकुंद काशीद, सचिन अग्रवाल, ओमसिंग बायस, पियुष लुंकड, मार्शल पिल्ले, हर्षल शेलोत आदी उपस्थित होते.
-------------
बास्केटबॉलला चालना मिळेल
केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाला नवी चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे बाबासाहेब कोतकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT