पुणे

पुणेकरांनो, हॉटेलात जेवायला जाताय? मग 'अशा' प्रकारची काळजी घ्या!

सकाळवृत्तसेवा

पुणे ः येत्या सोमवारपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र हॉटेलात जेवणासाठी गेल्यानंतर मास्क कसा वापरायचा? तेथे गेल्यानंतर कोरोनापासून बचाव होण्यासाठी हॉटेल चालक कोणती व कशी खबरदारी घेणार असे अनेक प्रश्‍न नागरिकांना पडले आहे. याबाबत पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलिअर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार ः

मास्क कसा वापरायचा?
हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण जोपर्यंत जेवायला सुरवात करीत नाहीत तोपर्यंत मास्क तोंडाला लावणे बंधनकारक आहे. वेटींगला थांबल्यानंतर, खाद्यपदार्थ टेबलावर येईपर्यंत आणि जेवण झाल्यानंतर लगेच मास्क वापरावा लागणार आहे. ग्राहक मास्क वापरताय की नाही यावर हॉटेल प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाईल. जेवणापुर्वी व नंतर मास्क वारण्याची विनंती त्यांना केली जाईल.

हॉटेलात येणाता काय खबरदारी घेतली जाणार?
ग्राहकांना हॉटेलच्या गेटवरच सॅनिटाईज केले जाईल. तसेच त्यांचे तापमान देखील तपासले जाणार आहे. ग्राहकांचा टेबल व बेसीन वगळता इतर कोणत्याही ठिकाणी स्पर्श होणार नाही, याचे व्यवस्थापन हॉटेल चालकांकडून केले जाईल. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर असणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्मचारी काय काळजी घेणार ः
ग्राहकांना सेवा पुरविण्यात हॉटेलातील कर्मचा-यांची जबाबदारी महत्त्वाची असते. त्यांनी सतत मास्क व ग्लोज वापराने बंधनकारक आहे. खाद्यपदार्थ वाढत असताना शक्‍य तेवढे अंतर व कमीत कमी वेळा त्याचा टेबलावरील पदार्थांना स्पर्श होईल, याची काळजी घेतली जाणार आहे.

जेवणाचे ताट व मेन्यू कार्ड कसे असणार ः
हॉटेलातील ताड धुवून पुन्हा वापरण्यात येतात. त्याची चांगली स्वच्छ केली नाही तर कोरोना पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे एकदाच वापराचे पर्यावरणपूरक ताट, वाटी व ग्लास वापरण्यात येणार आहे. तर मेन्यूकार्ड देखील एका साध्या पेपरवर असेल. ग्राहकांनी त्याआधारे ऑर्डर केल्यानंतर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल.

शक्‍य तेवढा स्पर्शविरहीत सेवेवर भर ः
खाद्यपदार्थांची ऑर्डर, पैसे देणे अशी कामे स्पर्श विरहीत करण्यावर भर द्यावा, अशा सूचना राज्य सरकारने यापूर्वीच काढलेल्या नियमावलीत केल्या आहेत. पार्किंगची सुविधा असलेल्या हॉटेल चालकांनी वाहनांचे देखील सॅनिटायझेशन करावे, असे देखील त्यात नमूद होते.

टेबलांत सामाजिक अंतर ः
50 टक्के क्षमतेने कामकाज सुरू करण्यास परवानगी असल्याने टेबलांची संख्या देखील कमी करण्यात येणार आहे. दोन टेबलांत सामाजिक अंतर असेल याची खबरदारी घेतली जाईल. तसेच टेबलचा वापर झाल्यानंतर ते प्रत्येकवेळी सॅनिटाईझ केले जाईल. तसेच हॉटेलात ठराविक अंतराने साफसफाई केली जाईल.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा पुन्हा दणका! थेट BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; राज्यभर कारवायांचा धडाका

Commonwealth Games 2026: जय हो! राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनचं पदक पक्कं झालं; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : 'युवकांच्या भविष्यासाठी राजकारण नको; चर्चेत अडथळे आणू नका', सर्व पक्षांना किरेन रिजिजू यांचे आवाहन

Solapur News: मंगळवेढ्यात वंचित बहुजन आघाडीचा बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध

IND vs ZIM 1st T20I : पहिल्या सामन्यापूर्वीच धक्का, फलंदाजाची दुखापतीमुळे माघार, बोर्डाने जाहीर केली रिप्लेसमेंट... नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT