पुणे

इस्कॉन भागवत कथा बातमी

CD

PNE26W46010 - कृष्णभक्तदास प्रभु

भागवत श्रवणातून जीवनाला सन्मार्गाची दिशा
कृष्णभक्तदास प्रभु; इस्कॉन मंदिरात भागवत कथेस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० : श्रीमद् भागवत कथा ही केवळ धार्मिक कथा नसून मानवी जीवनाला सन्मार्गाकडे नेणारा भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा स्रोत आहे. भागवत श्रवणामुळे मनातील विकार दूर होऊन आत्मिक शांतीचा अनुभव मिळतो. कलियुगात नामस्मरण आणि भागवत कथा श्रवण हे भगवंतप्राप्तीचे सोपे साधन असून, दैनंदिन धावपळीच्या जीवनातून काही वेळ हरिनामासाठी देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इस्कॉन सोलापूरचे अध्यक्ष कृष्णभक्तदास प्रभु यांनी केले. इस्कॉन मंदिरात सायंकाळी पाच ते सात या वेळेत आयोजित भागवत कथेत ते बोलत होते.
मानवी जन्माचे सार्थक भगवद््भक्ती आणि सत्कर्मातच असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनातील विकारांवर मात करण्यासाठी भगवंताचे नामस्मरण, सत्संग आणि भागवत श्रवण यांचा आधार घ्यावा. भागवताच्या माध्यमातून ज्ञान मिळते आणि त्या ज्ञानाचे आचरण केल्याने वैराग्याची भावना निर्माण होते. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा समन्वय साधल्यास मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सात्त्विक बनते. भक्तीमार्गामुळे समाजात प्रेम, बंधुभाव आणि नैतिक मूल्यांची जोपासना होते. त्यामुळे भागवताचा संदेश वैयक्तिक जीवनासोबतच सामाजिक जीवनालाही दिशा देणारा आहे, असे त्यांनी सांगितले.
-----------------------
नामस्मरणातून मनाला स्थैर्य
आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य ताणतणाव आणि विविध विचारांच्या गर्दीत जगत आहे. अशा परिस्थितीत दररोज काही वेळ हरिनामस्मरणासाठी दिल्यास मनाला स्थैर्य आणि शांती मिळते. भगवंताच्या नामस्मरणातून मन शुद्ध होत जाते आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी निर्माण होते. त्यामुळे भक्ती केवळ उपासनेपुरती मर्यादित न ठेवता ती आचरणात आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
-------------------
भजनांनी भाविक तल्लीन
कथेदरम्यान सादर केलेल्या सुमधुर भजनांमुळे मंदिरातील वातावरण अधिकच भक्तिमय झाले. संगीतमय प्रसंग आणि हरिनामाच्या गजरात उपस्थित भाविक तल्लीन झाले. ‘हरिनाम’ तसेच ‘भागवत भगवान की जय’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. भागवत कथेच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना भक्तीबरोबरच जीवन शुद्ध, संयमी आणि सन्मार्गी करण्याचा संदेश मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

Nepal Flood Viral Video : नेपाळमधील महापुरात देवदूत बनून आली म्हैस, तरुणाचा वाचवला जीव; हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून नेटकरीही भावूक

Ranjangaon Drunk Driving: रांजणगाव-सोनेसांगवी रस्त्यावर मद्यधुंद पिकअप चालकाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : मुंबईतील वांद्रे परिसरात महिलेच्या गाडीची ९ वर्षांच्या मुलाला धडक; जागीच मृत्यू

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT