पुणे

श्री भैरवनाथ मंदिरात सीमोल्लंघनाची परंपरा कायम

CD

खडकवासला, ता. १७ : येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात घटस्थापना करून नऊ दिवस दररोज आरती केली जाते. दसऱ्याच्या दिवशी ढोलांच्या गजरात पालखी मिरवणूक काढून सीमोल्लंघन केले जाते. या मिरवणुकीत बारा बलुतेदारांकडून पालखीला खांदा देण्याची परंपरा आजही कायम आहे.
सीमोल्लंघनासाठी पालखी गावाच्या वेशीपर्यंत नेल्यानंतर श्री मुकाईदेवी मंदिरात आरती करून पालखी पुन्हा भैरवनाथ मंदिरात आणली जाते. दरवर्षी फाल्गुन कृष्ण अष्टमीला (कालाष्टमी) येथे वार्षिक यात्रा भरते. या उत्सवात खडकवासला, कोल्हेवाडी आणि परिसरातील भाविक सहभागी होतात. गावातून पालखीचा छबिना काढला जातो. पूर्वी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा भरत असे.

शिवकाळातील ऐतिहासिक संदर्भ
खडकवासला गावाच्या इतिहासात भैरवनाथ मंदिराला धार्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक संदर्भही आहेत. गावातील शेतकऱ्यांनी सीडब्ल्यूपीआरएस, डीआयएटी, वनीकरण, धरण आणि कालव्यांच्या प्रकल्पांसाठी शेकडो एकर जमीन दिली आहे. स्वराज्याच्या काळातही गावातून जमीन दिल्याचे उल्लेख आढळतात. सध्याचे नवीन मंदिर दाक्षिणात्य बांधकामशैलीचा प्रभाव आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील भागात १५० लहान-मोठ्या मूर्ती आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडे श्री हनुमानाची, तर उत्तरेकडे श्री भैरवनाथाची मूर्ती आहे. मंदिराच्या मंडपात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दर्शविणारी तैलचित्रे आहेत. मंदिरासमोर दगडी दीपमाळ असून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ आहे.

पूर्वी मंदिराबाहेर सतीशिळा होती. युद्धात वीरमरण आलेल्या गावातील एका वीरपुरुषाच्या दोन्ही पत्नी सती गेल्याचे शिल्प त्यावर कोरलेले होते. पेशवेकाळात गावातील कुंभार बाहेरगावी गेल्यानंतर दुसऱ्या कुंभाराने गावात राहण्यासाठी जागा मागितली. त्या वेळी मंदिराचे छप्पर दुरुस्त करून देण्याच्या बदल्यात गावच्या पाटलांनी त्याला जागा आणि कुंभारकामाची जबाबदारी दिल्याची नोंद मोडी कागदपत्रांत आढळते.
-डॉ. नंदकिशोर ज. मते, इतिहास अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

Latest Marathi News Live Update : ग्राहक महिलेने लांबविले मंगळसूत्र श्रीरामपूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT