PNE26W61502
अहिल्यानगर ः मेहेरबाबांचे चरित्रकार भाऊ कलचुरींचा स्मृतीदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
-----------------
मेहेरबाबांचे चरित्रकार कलचुरींना अभिवादन
अहिल्यानगर, ता. २५ ः अवतार मेहेरबाबा यांचे चरित्रकार, ट्रस्टचे अध्यक्ष व बाबांचे रहिवासी मंडळामधील शेवटच्या सदस्यांपैकी एक भाऊ कलचुरी यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त नगर केंद्रामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नगरसह परदेशातील मेहेरप्रेमींनी विविध कार्यक्रम सादर केले. प्रथम अवतार मेहेरबाबा व भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नगर केंद्रात लघुपट सादर करण्यात आला. रामजू ओम्म, जॉर्डन, उमादेवी, पवन नाईक यांनी गाणी, भजने सादर केली. मनीषा दीक्षित यांनी मेहेर दर्शन महत्त्व सांगितले.
मेहेरनाथ कलचुरी म्हणाले की, भाऊ हे मेहेरबाबांच्या आश्रमात मंडळीमध्ये सगळ्यांत लहान वयाचे होते. घरदार, संपत्ती सोडून ते सहभागी झाले होते. मेहेरबाबांच्या मृत्यूपर्यंत ते त्याच्या बरोबर होते. ते अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष झाले. ते लेखक, कवी, विश्वासू प्रशासक आणि मेहेरबाबांच्या मंडळीतील एक व मेहेरबाबांचे चरित्रकार होते. त्यांनी लॉर्ड मेहेर हे २० खंडांत बाबांचे जीवन चरित्र लिहिले. याशिवाय ६० पुस्तके तसेच गझल, भजन, नाटिका, बाबांच्या तत्वज्ञानाची पुस्तके लिहिली. आरती, प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.