कुत्र्याच्या हल्ल्यात
जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू
भुसावळ, ता. १३ : शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत असताना नारायणनगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
तारकेश विशाल झोपे (वय ९) असे मृताचे नाव आहे. तारकेश हा २४ एप्रिलला सकाळी शाळेत जात असताना नारायणनगर परिसरात एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर व नाकावर गंभीर जखमा झाल्या होत्या. जखमांची तीव्रता इतकी होती की, मुलाच्या चेहऱ्यावर ८० टाके पडल्याचे समजते. घटनेनंतर त्याच्यावर जळगावच्या शिल्पा रुग्णालयात डॉ. श्रीराज महाजन यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने व प्लास्टिक सर्जरीची गरज भासल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्याचे निधन झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.