पुणे

बार्शी-येरमाळा रस्त्यावर दुर्दैवी अपघात, वृध्द महिलेचा मृत्यु

CD

महिलेच्या मृत्यूप्रकरणी
दुचाकीचालकावर गुन्हा

पांगरी : बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी येथे बार्शी-येरमाळा मार्गावर रविवारी (ता. १८) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचालकही जखमी झाला.
अयोध्या शिवराज चौधरी (वय ६२ रा. पिंपळवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. रामराजे शिवराज चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची आई अयोध्या चौधरी (वय ६२) या घरासमोरील बार्शी-येरमाळा रस्ता ओलांडून पलीकडे जात होत्या. दुचाकीवरील (एमएच १३ डीबी १६३७) कालिदास सुरेश काळे याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोराची धडक दिली. अयोध्या यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कालिदास काळे हाही अपघातात जखमी झाला. कालिदास सुरेश काळे याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार गणेश दळवी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

Pune Palkhi Traffic Update: पालखी आगमनानिमित्त पुण्यातील मुख्य रस्ते गुरुवारी बंद! वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Afghanistan Cricketer: आजाराशी झुंज अखेर संपली! अफगाणिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाचं निधन; क्रिकेटविश्वात शोककळा

राहुल द्रविडच्या दोन्ही पोरांनी मैदान गाजवले! अन्वयची भारतीय संघासाठी दमदार खेळी, तर थोरला समित महाराजा ट्रॉफीत चमकला

SCROLL FOR NEXT