पुणे

मिरा भाईंदर महापालिकेत भाजप नगरसेवकांची गुंडगिरी

CD

नगरसेवकांची नागरिकांसह
पत्रकारांना मारहाण

भाईंदर, ता. १६ : महासभेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यावरून निर्माण झालेल्या तणावात मिरा भाईंदर महापालिकेतील भाजप नगरसेविका व नगरसेवकांनी चक्क नागरिक व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. १६) सभागृहात घडला.

मिरा भाईंदर महापालिकेची महासभा सुरू असताना काही जण प्रेक्षागृहात मोबाईलवर चित्रीकरण करीत असल्याचा संशय महापौर डिंपल मेहता यांना आला. त्यांनी त्यावर आक्षेप घेत चित्रीकरण बंद करण्याच्या सूचना केल्या; मात्र त्यानंतरही चित्रीकरण सुरूच आहे, असे वाटल्याने महापौर चांगल्याच संतप्त झाल्या. महासभेच्या कामकाजाचे चित्रीकरण करणे नियमाविरोधात असल्याने पोलिसांना पाचारण करावे व संबंधितावर गुन्हे दाखल करावे, अशा सूचना महापौरांनी केल्या. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालणार नाही, अशी आक्रमक भूमिका महापौरांनी घेतली. त्यानंतर अचानक भाजप नगरसेविका व नगरसेवक प्रेक्षागृहाकडे गेले आणि त्यांनी चित्रीकरण करीत असलेल्या नागरिकांना धक्काबुक्की केली तसेच अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी सुरक्षारक्षक व पोलिसांनी चित्रीकरण करणाऱ्यांभोवती सुरक्षाकडे केले. त्यामुळे काही नगरसेवकांनी त्यांच्या दिशेने चपला भिरकावल्या. या वेळी घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांचे मोबाईल हिसकावून खाली आपटण्यात आले. तसेच त्यांना धमक्याही देण्यात आल्या. याचदरम्यान पोलिसानी संबंधित नागरिकांना प्रेक्षागृहातून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला असता, भाजप नगरसेवकांनी त्यांना मारहाण केली. तसेच पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. यामुळे संतप्त पत्रकारांनी सभागृहाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

SCROLL FOR NEXT