Kasaba Peth Bypoll Election Esakal
पुणे

Kasaba Peth Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला? 'हे' नाव आघाडीवर

शैलेश टिळक यांनी काल चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात विधानसभेच्या दोन जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष सतर्क झाले असनू निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. (Kasba Peth Bypoll Election)

दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने आपली अधिकृत भुमिका जाहीर केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे हे देखीप पक्ष इच्छुक आहेत. ही निवडणूक लढविण्याची तयारी महाविकास आघाडीकडूनही दर्शविली आहे. त्यानंतर भाजपकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आता पुणे शहर भाजपकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी शैलेश टिळक यांच्या नाव आघाडीवर आहे. शैलेश टिळक हे भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे पती आहेत. शैलेश टिळक यांनी काल चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. काल दुपारी शैलेश टिळक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली आहे. तर भाजप उद्या किंवा परवा अधिकृत उमेदवार घोषणा करण्याची शक्यता आहे.

तर पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून तयारी सुरु केलीय. कसबा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन भाजपने सर्वपक्षीयांना केलं आहे. तर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणूक पार पडणार आहे. हीच पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT