पुणे

भाजप प्रदेश कार्यकारिणीची पुण्यामध्ये आज बैठक

CD

पुणे, ता. ३० : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची सोमवारी (ता. ३१) पुण्यात बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात सकाळी अकरा वाजता बैठकीला सुरुवात होईल. चव्हाण यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणी बैठक आहे. बैठकीला पक्षाचे केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, राष्ट्रीय व राज्य परिषद सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा प्रभारी, विविध मोर्चाचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, माजी खासदार व माजी आमदार यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळात ही बैठक असणार आहे.
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. राजकीय आणि सामाजिक विषयांवरील ठराव या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोपाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT