पुणे

भाजप ओबीसी, किसान मोर्चा कार्यकारिणीवर सहाजणांना संधी भाजप ओबीसी, किसान मोर्चा कार्यकारिणीवर सहाजणांना संधी

CD

भाजप ओबीसी, किसान मोर्चा
कार्यकारिणीवर सहाजणांना संधी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ ः भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा व किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत सोलापूरच्या सहाजणांना संधी देण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर व किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे.
सोलापूर शहरातील संदीप जाधव आणि ग्रामीणमधील विक्रम शिरसाठ यांची ओबीसी मोर्चाच्या सहसंपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. तर किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी शशिकांत देशमुख, एफपीओ (शेतकरी उत्पादक कंपन्या) प्रमुखपदी विवेक खिलारे यांची, तसेच कार्यकारिणी सदस्यपदी दीपक चव्हाण व विलास बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ओबीसी समाज व शेती क्षेत्रातील विविध घटकांशी संपर्क वाढविणे, संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि पक्षाचे संघटन अधिक प्रभावी करण्याची जबाबदारी या सहाजणांवर राहणार आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांना प्रदेश कार्यकारिणीत प्रतिनिधित्व मिळाल्याने जिल्ह्यातील ओबीसी मोर्चा व किसान मोर्चाच्या संघटनात्मक कामाला बळ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Woman Minister Husband Controversy : महिला मंत्रीच्या पतीचा इंग्लिश नजराणा, अनेकांसोबत ठेवले संबंध; मंत्री पत्नीला ठार करण्याचा रचला कट

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Petrol Diesel Price Today: सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; महाराष्ट्रात 1 लिटरचा भाव किती?

SCROLL FOR NEXT