पुणे

पुण्यातून गावडे, जाधव यांना संधी

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ४ ः पुणे शिक्षक तसेच पदवीधर मतदार संघात भाजपने क्रमशः कौस्तुभ गावडे आणि डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, पक्षाने नागपूर पदवीधर मतदार संघातून सुधाकर कोहळे यांना संधी दिली आहे. उमेदवार निवडीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी दिल्लीवारी करत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपकडून रविवारी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने अलीकडेच तीन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपच्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेने दावा ठोकला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी मागील काही काळापासून त्या दृष्टीने तयारी चालवली होती. आता ते माघार घेणार की बंडखोरी करणार? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना संधी दिली आहे. पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि उच्चशिक्षित मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाने महिला चेहरा दिल्याचे मानले जात आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा मानला जातो. भाजपचे माजी आमदार आणि अनुभवी नेते सुधाकर कोहळे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत त्यांना याठिकाणी संधी दिली आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत कोहळे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली होती. तर २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पश्चिम नागपूर मतदारसंघात विकास ठाकरे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. विधान परिषद निवडणुकीत कोहळे यांची लढत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्याशी होईल. या निवडणुकीसाठी सहा ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून नऊ ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT