Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेत बनावट ओळखपत्रांचा सुळसुळाट

पुणे महापालिकेच्या कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सारखी ओळखपत्र तयार एजंट, कार्यकर्ते थेट इमारतीमध्ये प्रवेश करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेच्या कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सारखी ओळखपत्र तयार एजंट, कार्यकर्ते थेट इमारतीमध्ये प्रवेश करत आहेत. त्याच आधारे ठेकेदाराच्या फाइल मार्गी लावण्यासाठी काम केले जात आहे. त्याविरोधात प्रशासनाने बोगस ओळखपत्र जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे.

ओळखपत्रावर महापालिकेचा लोगो असलेली लेस व नावाच उल्लेख आहे. त्यामुळे हे महापालिकेच्या कायम सेवेत असलेले कर्मचारी असावेत असा भास निर्माण होतो. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित ठेकेदाराकडून ओळखपत्र देणे गरजेचे आहे. त्यावर त्याचे पद, कालावधी, विभाग याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्‍यक आहे. पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी असे कर्मचारी, एजंटावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठ दिवसात अशी १७५ बोगस ओळखपत्र जप्त केली आहेत. हे ओळखपत्र घालून महापालिकेत फिरणाऱ्यांना तंबी देऊन सोडून देण्यात आले आहेत.

सुरक्षा विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांच्या ठेकेदाराने ओळखपत्र देणे गरजेचे आहे. इतर नागरिक बनावट ओळखपत्र घालून येत आहे. अशांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार १७५ ओळखपत्र जप्त केले आहेत. यापुढे कायदेशीर कारवाई केली जाईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT