पुणे

पिंपरी अहवाल राज्य शासनाकडे

CD

बोगस उपसूचना प्रकरणाचा
अहवाल राज्य शासनाकडे

पिंपरी, ता. १४ : महापालिका स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता बोगस उपसूचनेच्या आधारे ठेकेदारांना ६० कोटी रुपयांची देयके दिलेल्या प्रकरणाचा चौकशी अहवाल दोन दिवसांपूर्वी समितीने माझ्याकडे दिला आहे. पुढील कारवाईसाठी शासनाकडे अहवाल पाठविला आहे. सविस्तर अहवाल महापौरांना सादर केला जाईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सांगितले.
आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या शेवटच्या आठवड्यात अर्थात २४ ते ३१ मार्च या कालावधीत महापालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेकडे न देता १४ बोगस उपसूचना थेट लेखा विभागाकडे दिल्या. त्या माध्यमातून नियम धाब्यावर बसवून सुमारे ६० कोटी रुपयांची बिले ठेकेदारांना अदा केल्याचा गंभीर गैरप्रकार सिद्ध झाला आहे. या प्रकरणावरून स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला असल्याचे आयुक्तांनी सभागृहात सांगितले.

मनसेचे आंदोलन
बोगस उपसूचनांद्वारे ६० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. त्यातील दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर त्यांनी आंदोलन केले.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

SCROLL FOR NEXT