Vaccine Sakal
पुणे

आरोग्य सेवकांना हवाय लशीचा बूस्टर डोस

देशातील बहुतांश डॉक्टर आणि परिचारिका कोरोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस घेण्यास तयार असल्याचा निष्कर्ष ‘मेडस्केप’ने देशभरात केलेल्या सर्वेक्षणातून निघाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशातील बहुतांश डॉक्टर (Doctor) आणि परिचारिका (Hostess) कोरोना प्रतिबंधक लशीचा (Vaccine) बूस्टर डोस (Booster Dose) घेण्यास तयार असल्याचा निष्कर्ष ‘मेडस्केप’ने (Medscape) देशभरात केलेल्या सर्वेक्षणातून निघाला. बूस्टर डोस घेण्यास विरोध करणाऱ्या आरोग्य सेवकांची टक्केवारी कमी असल्याचेही यातून दिसते.

आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका तसेच रुग्णालयांमधील तंत्रज्ञ, कर्मचारी यांना १६ जानेवारीपासून प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरवात झाली. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांमध्ये दुसरा डोस या आरोग्य सेवकांना देण्यात आला. त्याला आता सहा महिने झाले आहेत. त्यामुळे आता आरोग्य सेवकांना लशीचा बूस्टर डोस घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर ‘मेडस्केप’ने देशभरात सर्वेक्षण केले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.

जगभरात काय चाललंय?

  • इस्राईलने जुलैपासून ६० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरवात केली आहे. दुसरा डोस घेऊन पाच महिने झालेल्या नागरिकांना हा बूस्टर डोस दिला जात आहे.

  • ब्रिटन आणि जर्मनी यांनाही बूस्टर डोस देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

  • जगातील दहा देशांनी ७५ टक्के लसीकरण केले आहे. पण, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या जेमतेम दोन टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केले आहे.

असे झाले सर्वेक्षण

  • कोरोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस तुम्हाला घ्यायचा आहे का, हा प्रश्न निवडक ७३२ डॉक्टरांना विचारण्यात आला. तसेच, हा प्रश्न एक हजार २०० परिचारिकांनाही विचारण्यात आल्या.

  • ४ ते १५ ऑगस्ट या दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले.

निष्कर्ष काय आहेत?

  • ५० टक्के डॉक्टर लगेच बूस्टर डोस घेण्यास तयार आहेत

  • लगेच बूस्टर डोस घेण्यास तयार असलेल्या परिचारिकांची टक्केवारी ३८ आहे

  • सरकारी आदेशानंतरच ४४ टक्के डॉक्टर लशीचा बूस्टर डोस घेण्यास इच्छुक

  • ५० टक्के परिचारिका मात्र बूस्टर डोस घेण्याच्या बाजूने होत्या

  • ३ टक्के डॉक्टर आणि ८ टक्के परिचारिका बूस्टर डोसच्या बाजूने नव्हत्या

दृष्टीक्षेपात देशातील लसीकरण

  • १६ जानेवारी ते २४ ऑगस्टपर्यंतचे लशीचे डोस : ५९ कोटी २५ लाख ४९ हजार २४७

  • पहिला डोसची संख्या : ४५ कोटी ९५ लाख ३२ हजार ५८८

  • दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या : १३ कोटी ३० लाख १६ हजार ६५९

  • १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण : २७ कोटी ६८ लाख ६५ हजार ५१९

  • ४५ ते ६० वर्षे गटातील लसीकरण : १८ कोटी ४८ लाख २६ हजार ५७७

  • ६० पेक्षा अधिक वयोगटातील लसीकरण : १२ कोटी ७४ लाख ९ हजार २५७

  • पुरुष : ३१ कोटी ११ लाख ९० हजार ७८९

  • महिला : २७ कोटी ७७ लाख ९१ हजार ०३६

  • कोव्हिशिल्डचे डोस : ५१ कोटी ५५ लाख ४९ हजार ००८

  • कोव्हॅक्सिनचे डोस : ७ कोटी २८ लाख ४८ हजार ३८४

  • स्पुटनिक : ७ लाख ३ हजार ९६१

  • दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. त्या खालोखाल गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

SCROLL FOR NEXT