bsi sakal
पुणे

दिल्लीतील कार्यालयाच्या सुशोभिकरणासाठी पुण्यातील वृक्षसंपदा

भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागाला शोधावी लागली रोप

दिलीप कुऱ्हाडे

येरवडा : केंद्र सरकारच्या भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण (BSI) विभागाच्या कार्यालयाला शहरातील रोपवाटिकांमध्ये विविध रोपे शोधण्याची वेळ आली. 'बीएसआय' च्या दिल्ली (delhi) कार्यालयाच्या आवारात सुशोभिकरणासाठी रोपांची आवश्‍यकता होती. दुर्मिळ व अनेक राेपांची शोध लावलेल्या 'बीएसआय' कडे सध्या रोपांचा दुष्काळ आहे. त्यामुळे त्यांना पुणे (pune) शहरातील रोपवाटिकांमधून विविध जातीचे चार हजार रोपे गोळा करून सोमवारी सायंकाळी दिल्लीला पाठवावी लागली.

कोरेगाव पार्क (koregaon park) येथील भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागातील रोपवाटिकेत अनेक दुर्मिळ जातींचे राेपे आहेत. बीएसआयच्या मुंढवा येथील रोपवाटिकेत देश विदेशातील दुर्मिळ रोपे काही वर्षांपूर्वी होती. मात्र येथील माळी हे पद त्यांनी भरले नसल्यामुळे या रोपांची देखभाल व निगा राखलीच गेली नाही. त्यामुळे ही रोपवाटिका ओस पडली आहे. रोपवाटिकेच्या दुरावस्थे बाबत दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना माहिती नव्हती. त्यांनी दिल्ली कार्यालयाच्या आवारात रोपांची आवश्‍यकता असल्याचे फर्मान सोडले.

त्यामुळे येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांची रोपे गोळा करण्याकरीता दमछाक झाली. शहरातील विविध रोपवाटिका,अेम्प्रेस गार्डन आदी ठिकाणावरून चार हजार रोपे कशीबसी अधिकाऱ्यांनी गोळा केली. ही रोपे आपल्याच राेपवाटिकेतील असल्याचे दाखवून त्यांनी ही रोपे ट्रकने दिल्लीला पाठविली. याबाबत कार्यालयाचे अध्यक्ष वनस्पती वैज्ञानिक डॉ. अे.बेन्नीयामिन यांना विचारले असता त्यांनी कानावर हात ठेवले. ही माहिती देण्यासाठी कोलकत्ता येथील मुख्य कार्यालयालातून परवानगी घ्यावी लागेल असे त्यांनी सांगितले.

चंदनाच्या झाडांची चोरी

भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागाची मुंढवा येथे पंचवीस अेकर जागेत रोपवाटिका आहे. या राेपवाटिकेतील दुर्मिळ रोपे ही इग्लंडच्या वनस्पतीशास्त्र संग्रहालयात देखील आहेत. त्यामुळे या रोपवाटिकेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या रोपवाटिकेची आता दुरावस्था झाली आहे. सिमाभिंत सुरक्षित नसल्यामुळे या रोपवाटिकेतील शेकडो चंदनाची झाडांची चोरट्यांनी कत्तल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT