Pune Crime News  sakal
पुणे

Pune Crime News : धक्कादायक! मुलावर लैंगिक अत्याचार करून खून; बावधन टेकडीवर आढळला मृतदेह

येथील पिंक सिटी सोसायटीसमोरील घरासमोर खेळणाऱ्या सलेमान राधेश्याम बरडे या साडेआठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून करणाऱ्या संशयित आरोपीला वाकड पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

वाकड : येथील पिंक सिटी सोसायटीसमोरील घरासमोर खेळणाऱ्या सलेमान राधेश्याम बरडे या साडेआठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून करणाऱ्या संशयित आरोपीला वाकड पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. त्याच्यावर अपहरण, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पवन जागेश्वरप्रसाद पांडे (वय २८, रा. गाव नागर, जि. चित्रकूट, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मृत बालकाचे वडील राधेश्याम रायसिंग बरडे (वय ३३, रा. रोहित कलाटे चाळ, पिंकसिटी सोसायटीसमोर, वाकड) यांनी त्याचे अपहरण झाल्याची तक्रार वाकड पोलिसांत दिली होती. शनिवारी सायंकाळी सलेमानचे अपहरण झाले होते तर रविवारी दुपारी बावधन येथील टेकडीवर त्याचा मृतदेह आढळला होता.

हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने वाकडचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाच्या दोन टिम तयार करून, सलेमानचा शोध सुरू केला. गुन्हा घडल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, सलेमानला पांडे घेऊन जात असल्याचे दिसल्याने त्याला ताब्यात घेतले. अनैसर्गिक कृत्य करून त्याचा खून केला व मृतदेह बावधन येथे टाकल्याचे सांगितले.

बरडे बांधकाम मजूर आहेत. त्यांना चार मुले असून, सलेमान लहान होता. बरडे कुटुंबीय राहत असलेल्या चाळीशेजारीच असलेल्या गुऱ्हाळात आरोपी कामाला होता. तिथेच सलेमान खेळत असल्याने दोघांची ओळख होती. यातून आरोपीने एक- दोनदा त्याला उसाचा रस देऊन ओळख वाढवली. त्यानंतर त्याचा विश्‍वास संपादन केला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविला आहे. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणाही आढळल्या आहेत. मात्र, पवनने खून कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT