Brother attacked three sisters with iron rod pune warje crime  
पुणे

Pune Warje Crime : वारजेत तीन मुलींवर लोखंडी रॉडनं हल्ला; दोघींची प्रकृती गंभीर

क्रिकेट खेळण्याचा वादातून मावस भावाने लहान तीन बहिणींवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक माहिती

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेट खेळण्याच्या वादातून तीन मुलींवर लोखंडी रॉडनं हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तिन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. (Brother attacked three sisters with iron rod pune warje crime)

पुण्यातील वारजे परिसरात ही घटना घडली आहे. क्रिकेट खेळण्याचा वादातून एकानं इतर साथीदारांसह लोखंडी रॉडनं ८ आणि १२ वर्षीय मुलींवर हल्ला केला. कृष्णा सहानी यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. याप्रकरणी, रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास वारजेतील दांगट वस्ती जवळ घडली. फिर्यादी आणि आरोपी हे दोघंही भावंड आहेत. या दोघांमध्ये मैदानावर क्रिकेटच्या खेळावरून काही वाद झाले होते. या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी कृष्णा याला मारण्यासाठी थेट घरात प्रवेश केला.

यावेळी आरोपींना कृष्णा दिसला नाही, त्यामुळं त्यांनी घरातील उपस्थित असलेल्या महिलांना लोखंडी रॉडनं मारहाण केली. या हल्ल्यात कृष्णा यांची आई तसंच तीन लहान मुलींवर रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन साथीदारांनी हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या लहान मुलींना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असून यातील दोन जणींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर वारजे पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT