Gun Firing Sakal
पुणे

Pune Crime : व्यापाऱ्यावर गोळ्या झाडून चार लाखांची रोकड लुटली; व्यापारी गंभीर जखमी

नाना पेठेतील एका व्यापाऱ्यावर गोळ्या झाडून हल्लेखोरांनी चार लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना स्वारगेट परिसरात बुधवारी रात्री घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नाना पेठेतील एका व्यापाऱ्यावर गोळ्या झाडून हल्लेखोरांनी चार लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना स्वारगेट परिसरात बुधवारी रात्री घडली. या घटनेत व्यापारी गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लतेश हसमुखलाल सुरतवाला (वय ५१, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचा नाना पेठेतील मंडई परिसरात तंबाखू-सिगारेट विक्रीचा व्यवसाय आहे. ते चार लाखांची रोकड बॅगेत घेऊन रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते.

जेधे चौकातून सारसबागेच्या दिशेने जात असताना त्यांना तीन हल्लेखोर दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात आले. गणेश कला क्रीडा मंचजवळ आल्यानंतर चोरट्यांनी गावठी कट्ट्यातून सुरतवाला यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या पाठीत आणि एक गोळी मांडीत घुसली.

त्यात सुरतवाला हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत, अशी माहिती स्वारगेटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी दिली.

यापूर्वीही चोरट्यांकडून दोनदा पाठलाग

हल्लेखोर लतेश सुरतवाला यांच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवून होते. त्यांनी सहा जुलै रोजी त्यांचा पाठलाग केला होता. तसेच, नऊ जुलै रोजीही त्यांना लुटण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे त्यांनी बुधवारी घरी जाण्याचा मार्ग बदलला. परंतु सुरतवाला यांनी ही बाब पोलिसांना कळवली नव्हती, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक झावरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT