cyber crime sakal
पुणे

Pune : सायबर चोरट्यांचा व्यावसायिकाला ३८ लाखांचा गंडा

मोबाईल बँकिंग वापरत नसताना देखील हा प्रकार घडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाकड (Wakad) येथील एका व्यावसायिकाच्या बँक खात्याची माहिती हॅक करीत सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ३८ लाख चार हजार रुपये लांबवले आहेत. व्यावसायिकाने या व्यवहाराबातचे ओटीपी, अलर्टस, मेसेज किंवा मेल कोणालाही पाठवलेले नाहीत. तसेच ते मोबार्इल बँकिंग वापरत नसताना देखील हा प्रकार घडला आहे.

काळेवाडी फाटा येथे राहणा-या एका व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाकड पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ जुलै रोजी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कंपनी सल्लागार म्हणून व्यवसाय आहे. त्यांचे एचडीएफसी बँकेत स्वतःचे आणि फर्मचे प्रत्येकी एक असे दोन खाते आहेत.

१५ जुलै रोजी त्यांना त्यांच्या खात्यातून दोन लाख १४ हजार रुपये वर्ग झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे त्यांनी बँकेतील शिल्लक रक्कम तपासली असता त्यांना दोन्ही खात्यातून ३८ लाख चार हजार रुपये वर्ग झाल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी त्वरित याबाबत पोलिसांत तक्रार दिली.

या व्यवहाराबातचे ओटीपी, अलर्टस, मेसेज, मेल किंवा बँक खात्याची माहिती मी कोणालाही पाठवलेले नाही. तसेच मी मोबार्इल बँकिंग वापरत नसताना देखील हा प्रकार घडला आहे, असे व्यावसायिकाने दिलेल्या फिर्याद नमूद आहे. वाकड पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT